शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

आयडीबीआयला ठगविणाऱ्या सूत्रधाराचा साथीदार अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:52 IST

कर्ज घेऊन आयडीबीआय बँकेला कोट्यवधी रुपयांनी ठगविण्याच्या प्रकरणात सूत्रधार प्रशांत बोरकरच्या साथीदाराला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. अटकेतील आरोपी ताजने ले-आऊट, वडधामणा येथील योगीराज ऊर्फ भास्कर आदे (३२) आहे. योगीराज याच्या अटकेनंतर आता या प्रकरणातील आरोपींची संख्या १३ झाली आहे.

ठळक मुद्देशेतकरी सांगून मिळविले कर्ज : १३ आरोपींना आतापर्यंत झाली अटक

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : कर्ज घेऊन आयडीबीआय बँकेला कोट्यवधी रुपयांनी ठगविण्याच्या प्रकरणात सूत्रधार प्रशांत बोरकरच्या साथीदाराला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. अटकेतील आरोपी ताजने ले-आऊट, वडधामणा येथील योगीराज ऊर्फ भास्कर आदे (३२) आहे. योगीराज याच्या अटकेनंतर आता या प्रकरणातील आरोपींची संख्या १३ झाली आहे.योगीराजने पीक कर्ज घेऊन आयडीबीआय बॅँकेच्या गोधनी शाखेला १ कोटी ७४ लाख रुपयांचा चुना लावला होता. या प्रकरणात पोलिसांनी सूत्रधार प्रशांत बोरकर त्याचा साथीदार राजेश गुहे, संतोष नंदागवळी, अनिल घोडे, सारंग चिटकुले, सचिन चिटकुले, विक्रांत कंगाले, रामाजी भेंडे, जसवंतसिंह प्रधान, पतिराम बावनकर, लखनलाल राठौड व योगीराज बिटले यांना अटक केली आहे. या प्रकरणातील सूत्रधार बोरकर याने बँकेत बोगस दस्तावेज सादर करून बँकेला कोट्यवधी रुपयांचा चुना लावला होता. त्याने स्वत:ला शेतकरी सांगून खोट्या सातबाऱ्यांच्या आधारे कर्ज घेऊन जमीन बँकेकडे गहाण ठेवली होती.या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना आयडीबीआय बँकेच्या भंडारा येथील खोखर्ला शाखेत बोगस दस्तावेज सादर करून अडीच लाख रुपयांचे पीककर्ज गोदामासाठी घेतल्याचे आढळले होते. यात योगीराज आदे, सारंग चिटकुले, सचिन चिटकुले, जसवंतसिंह प्रधान, राजेश गुहे, प्रशांत बोरकर सहभागी होते. आरोपींनी भुशाला तांदूळ दाखवून कर्ज मिळविले होते. तांदळाच्या पोत्याच्या जागी भुशाचे पोते दाखवून अधिकाऱ्यांना फसविले होते. आर्थिक शाखेच्या तपासणीत हा घोटाळा पुढे आला होता. बँकेने भंडारा येथे तक्रार दाखल केली होती.दोन्ही घोटाळ्यात प्रशांत बोरकर नंतर योगीराज आदे यांची महत्त्वाची भूमिका होती. योगीराज हा बोगस दस्तावेज बनविण्यात सक्रिय होता. तो वाहनचालकाचे काम करतो. गुन्हे शाखा आठवडाभरापासून योगीराजचा पाठलाग करीत होती. सोमवारी रात्री तो पोलिसांच्या हाती लागला. तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल काळे यांनी त्याला न्यायालयात सादर केले. त्याला १ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. योगीराज बोरकर याच्या इशाऱ्यावर काम करीत असल्याचा पोलिसांना संशय आहे. सूत्रांच्या मते या प्रकरणात बँकेच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करणे महत्त्वाचे ठरणार आहे. संशय आहे की अधिकाऱ्यांनी दस्तावेजाची गंभीरतेने निरीक्षण केले नाही. आरोपींकडून एकाच बँकेला ठगविण्यात आल्यामुळे या प्रकरणाचा संशय अधिक वाढला आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीArrestअटक