शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

पेंटिंगचे काम न दिल्यावरून प्राणघातक हल्ला

By योगेश पांडे | Updated: January 30, 2024 17:35 IST

पोलिसांनी अनिलला अटक केली आहे.

नागपूर : पेंटिंगचे काम न दिल्याच्या कारणावरून आरोपीने एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला. राणाप्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

सुरेश नारायण वगारे (३८, आंबेडकरनगर, गायत्रीमंदिराजवळ) असे जखमीचे नाव आहे. आरोपी अनिल अयोध्याप्रसाद पटेल (३१, भीमनगर, एमआयडीसी) हा त्यांना पेंटिंगचे काम मागत होता. मात्र वगारे यांनी त्याला काम दिले नाही. यावरून अनिल संतापला होता. सोमवारी दुपारच्या सुमारास त्याची वघारे यांच्यासोबत आयटी पार्क मार्गावरील श्रमविज्ञान संस्थेच्या कंपाऊंडजवळ भेट झाली. त्याने पेंटिंगचे काम न दिल्याच्या कारणावरून वाद उकरून काढला. त्याने वघारे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व त्यांच्या डोके तसेच चेहऱ्यावर दगडाने प्रहार केले. यात वघारे गंभीर जखमी झाले. समोरच आयटी कंपन्या असल्याने तेथे अनेक आयटी कर्मचारीदेखील होते. परिसरात खळबळ उडाली. वघारे यांना एका खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यांचे भाऊ निलेश वघारे यांच्या तक्रारीवरून राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अनिलला अटक केली आहे.

आयटी पार्कमध्ये गुंडांची दहशतआयटी पार्क परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत हातठेले आहेत. सकाळपासून ते रात्रीपर्यंत तेथे गर्दी असते व त्यात अनेक गुंड प्रवृत्तीचे तरुणदेखील असतात. या परिसरात अनेकदा हाणामारीच्या घटना होतात. नागपुरातील महत्त्वाच्या आयटी कंपन्या असल्याने तेथे मोठ्या प्रमाणावर कर्मचारी असतात. मात्र पोलिसांकडून ही बाब गंभीरतेने घेण्यात येत नाही. अनधिकृत ठेल्यांना एकाप्रकारे संरक्षणच दिल्याने तेथे समाजकंटकांचा वावर वाढला आहे.

टॅग्स :nagpurनागपूर