शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जीव जाईपर्यंत केले वार : तीन शस्त्रांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 21:34 IST

‘फेसबुकवर’ सक्रिय असलेल्या पत्नीचा गळा कापणारा विलास भुजाडे अनेक दिवसांपासून संतापलेला होता. त्याने पत्नीला अनेकदा मोबाईल व सोशल मीडियापासून दूर राहण्यासाठी फटकारले होते. परंतु पत्नीने याला गांभीर्याने घेतले नसल्याने तिचा खून केल्याचे तो सांगत आहे. नंदनवन पोलिसांनी त्याला १६ मेपर्यंत पोलीस कोठडीत घेतले आहे.

ठळक मुद्दे१६ मेपर्यंत पोलीस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘फेसबुकवर’ सक्रिय असलेल्या पत्नीचा गळा कापणारा विलास भुजाडे अनेक दिवसांपासून संतापलेला होता. त्याने पत्नीला अनेकदा मोबाईल व सोशल मीडियापासून दूर राहण्यासाठी फटकारले होते. परंतु पत्नीने याला गांभीर्याने घेतले नसल्याने तिचा खून केल्याचे तो सांगत आहे. नंदनवन पोलिसांनी त्याला १६ मेपर्यंत पोलीस कोठडीत घेतले आहे.हिवरीनगर येथील रहिवासी रेशन व्यापारी विलास भुजाडेने मंगळवारी मध्यरात्री २९ वर्षीय पत्नी श्रुती भुजाडे हिचा गळा कापून खून केला. त्याला घटनास्थळीच पकडण्यात आले. विलासला पाच वर्षाची मुलगीही आहे. त्याचा श्रुतीसोबत वाद सुरू होता. श्रुती मोबाईलवर मैत्रिणी व इतरांशी बोलत असे. ती अनेकदा व्हिडिओ कॉलही करायची. फेसबुकवर ती अ‍ॅक्टिव्ह राहत होती. यामुळे विलासला श्रुतीचे तिच्या कॉलेजमधील जुन्या मित्रांशी नाते असल्याचा संशय आला होता. तो तिच्यावर पाळत ठेवू लागला होता. तिला मोबाईल व फेसबुकपासून दूर राहायला सांगायचा, परंतु जेव्हाही रिकामा वेळ मिळत असे श्रुती मोबाईलवर बोलत असायची. यामुळे विलासचा संशय आणखी वाढला होता. मंगळवारी रात्रीपासूनच दोघांमध्ये वाद सुरू होता. रात्री ३ वाजता विलासने श्रुतीची हत्या केली. त्याने स्वयंपाक घरातील चाकू, वस्तरा आणि चॉपरने श्रुतीचा गळा कापला. त्याने तिचा जीव जाईपर्यंत वार केले. यात त्याचा हातही कापला गेला. परंतु त्याचे वार करणे सुरूच होते.खून केल्यानंतरही विलासच्या मनात प्रचंड राग आहे. यामुळे पोलीस त्याची विचारपूस करताना अतिशय संयम ठेवत आहे. पोलीस श्रुतीचे मोबाईल व सोशल मीडिया अकाऊंटचीही तपासणी करणार आहे. त्यानंतरच खरे कारण समोर येऊ शकेल. या घटनेमुळे सर्वाधिक फटका त्यांच्या पाच वर्षाच्या मुलीला बसला आहे. ती नेहमीसाठी आईपासून पोरकी झाली आहे आणि वडीलही तुरुंगात गेले आहेत. तपास अधिकारी पीएसआय काळुसे यांनी विलासला आज न्यायालयात सादर करीत १६ मेपर्यंत पोलीस कोठडीत घेतले आहे. या घटनेमुळे विलास व श्रुतीच्या कुटुंबीयांनाही प्रचंड धक्का बसला आहे.

टॅग्स :Murderखूनnagpurनागपूर