शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या वादातून दोघांवर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:09 IST

गिट्टीखदान आणि कळमन्यामध्ये गुन्हे नागपूर : गिट्टीखदान आणि कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघांवर प्राणघातक हल्ला करून आरोपींनी त्यांना गंभीर ...

गिट्टीखदान आणि कळमन्यामध्ये गुन्हे

नागपूर : गिट्टीखदान आणि कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघांवर प्राणघातक हल्ला करून आरोपींनी त्यांना गंभीर जखमी केले. गिट्टीखदानमधील जखमीचे नाव शहजाद खान हाफिज खान (वय २१)आहे. त्याच्यासोबत आरोपी सूरज आनंद मुरमुरे (वय २६) याचा वाद आहे. त्यातून रविवारी रात्री ७ च्या सुमारास आरोपी मुरमुरेने शहजादवर चाकूने हल्ला चढवला. दोन वार चुकविल्यानंतर तिसरा वार पायावर लागल्याने शहजाद जबर जखमी झाला. गवळीपुऱ्यात घडलेल्या या घटनेने वातावरण गरम झाले. शहजादच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

दुसरी घटना कळमन्यातील नाका नंबर चारजवळ रविवारी दुपारी घडली. राजू निंबाजी सोनकुसरे आणि हरी श्रीराम सोनकुसरे हे दोघे रविवारी दुपारी पूजेचे सामान घेऊन घराकडे जात असताना कळमन्यातील नागराजनगर महादेव घोडेवाल्याच्या घराजवळ बाप्या नामक आरोपीने त्यांना रोखले. बाप्याने हरीला मारहाण सुरू केली. ते पाहून राजू वाचवण्यासाठी गेला असता बाप्याने लाकडी दांड्याने हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले. तर बाप्याच्या आईने त्याला चपलेने मारहाण केली. राजूच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी आरोपी बाप्या आणि त्याच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल केला.

----