शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात जन्मदात्रीला मारणाऱ्या दारुड्या भावाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 14:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जन्मदात्या आईला नेहमी मारहाण करणाऱ्या दारुड्या भावाची त्याच्या लहान भावाने हत्या केली. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मॉडल मिल चौकाजवळ सोमवारी पहाटे ३ च्या सुमारास घडली.पंकज पायेश्वर विंचूरकर (वय ४०) असे मृताचे नाव आहे. त्याला त्याचा लहान भाऊ आरोपी नीरज पायेश्वर विंचूरकर (वय ३०, मॉडल मिल चौक नागपूर) ...

ठळक मुद्देतीन दिवसांत खुनाची दुसरी घटनागणेशपेठमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जन्मदात्या आईला नेहमी मारहाण करणाऱ्या दारुड्या भावाची त्याच्या लहान भावाने हत्या केली. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मॉडल मिल चौकाजवळ सोमवारी पहाटे ३ च्या सुमारास घडली.पंकज पायेश्वर विंचूरकर (वय ४०) असे मृताचे नाव आहे. त्याला त्याचा लहान भाऊ आरोपी नीरज पायेश्वर विंचूरकर (वय ३०, मॉडल मिल चौक नागपूर) याने मारले. मृत पंकजला दारूचे व्यसन होते. दारू पिल्यानंतर त्याला कशाचेच भान राहत नव्हते. तो दारूच्या नशेत जन्मदात्या आईलाही मारहाण करीत होता. घरच्यांकडून तसेच शेजाऱ्यांकडून वारंवार समजूत घालूनही त्याचा फायदा होत नव्हता. रविवारी रात्री दारूच्या नशेत आल्यानंतर त्याने घरात भांडण सुरू केले. पहाटेपर्यंत ते सुरूच होते. ३ च्या सुमारास त्याने आईला मारणे सुरू केले. ते पाहून छोटा भाऊ नीरज मध्ये पडला. त्याने त्याला समजावण्याचे प्रयत्न केले असता पंकजने त्यालाही मारहाण केली. त्यामुळे रागाच्या भरात नीरजने जवळ पडलेला फरशीचा तुकडा उचलून पंकजच्या डोक्यात घातला. दारूच्या नशेत असलेल्या पंकजच्या डोक्यातून रक्ताची धार निघाली अन् तो जागीच गतप्राण झाला. हा अनपेक्षित गुन्हा घडल्याने नीरज सुन्न पडला. त्याने आाणि आईने शेजाऱ्यांना झालेला प्रकार सांगितला. शेजाऱ्यांनी गणेशपेठ पोलिसांना कळविला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून नीरजला ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर त्याला अटक करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.विशेष म्हणजे, जागनाथ बुधवारी परिसरातील सावजी गल्लीत शुक्रवारी पहाटे अशीच घटना घडली होती. राजू रामभाऊ आमदे (वय ४२) याने त्याचा लहान भाऊ संजय रामभाऊ आमदे (वय ४१) याची हत्या केली होती. मृत संजय याला दारूचे भारी व्यसन होते. दारूच्या नशेत घरी येऊन तो पत्नी आणि आईला बेदम मारहाण करायचा. गुरुवारी मध्यरात्रीनंतर त्याने आईला मारहाण केल्यामुळे संतप्त झालेल्या मोठा भाऊ राजूने त्याला कपडे धुण्याच्या मोगरीने बदडले. परिणामी त्याचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :Murderखून