शहरं
Join us  
Trending Stories
1
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
2
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
5
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
6
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
7
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
8
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
9
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
10
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
11
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
12
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
13
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
14
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
15
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
16
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
17
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
18
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
19
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
20
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   

एस्पायरने दिली विद्यार्थ्यांना दिशा

By admin | Updated: June 13, 2015 03:08 IST

लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअरचे थाटात उद्घाटन : पहिल्याच दिवशी विद्यार्थी, पालकांची उसळली गर्दी

नागपूर : मेडिकल, इंटेरिअर डिझाईन, व्यवस्थापन, आयटीआय, रिटेल, एव्हीएशन, मीडिया, अ‍ॅनिमेशन, गेमिंग, प्रोफेशनल क्लासेस, हॉटेल मॅनेजमेंट, फॉरेन लँग्वेज, पॉलिटेक्निक, स्पोकन इंग्लिश, लॉ कॉलेज, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, कॅपिटल मार्केट, दहावीचे बोर्ड, सीबीएसईचे शिकवणी वर्ग आणि कमवतानाच शिक्षणाची संधी अशी नाविन्यपूर्ण माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते. विविध अभ्यासक्रम व शिकवणी वर्गाच्या शुल्कासह सर्वच सविस्तर माहिती जाणून घेतल्यावर पालकांचा जीवही भांड्यात पडत होता, तर काहींची नावनोंदणीसाठी लगबग सुरू होती. निमित्त होते लोकमत आणि मेघे ग्रुप प्रायोजित ‘लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअर-२०१५’चे. काँग्रेसनगर येथील धनवटे नॅशनल महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या ‘लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअर’चे उद्घाटन शुक्रवारी सकाळी महापौर प्रवीण दटके यांच्या हस्ते थाटात पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे आमदार समीर मेघे, आमदार सुधाकर कोहळे, फेअरचे सहप्रायोजक व स्नेहा एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे रजनीकांत बोंद्रे व श्याम शेंद्रे, प्रियदर्शिनी ग्रूप आॅफ इन्स्टिट्यूशनचे प्राचार्य डॉ. विवेक नानोटी, पीडीआयएमटीआरचे प्राचार्य मुकुल बुरघाटे, मेघे ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अविचल कपूर, डॉ. कविता पाटील, सीआरएमचे दिलीप सोनवणे, लोकमतचे सहायक उपाध्यक्ष निलेश सिंह, लोकमत समाचारचे विकास मिश्र आदी उपस्थित होते. संचालन सखी मंच संयोजिका नेहा जोशी यांनी केले.शिक्षणाच्या माहितीचा खजिना खुलादहावी, बारावीचे शिकवणी वर्गांपासून ते त्यानंतर कोणत्या शाखेला जायचे, कोणाला भेटायचे, खरी माहिती मिळेल काय, खिशाला परवडेल असा कोर्स आहे काय... या प्रश्नांनी ग्रामीण भागातीलच नव्हे तर शहरातील पालक-विद्यार्थीही गोंधळून जातात, मात्र गेल्या दोन वर्षांपासून ‘लोकमत’ने एज्युकेशन फेअरच्या माध्यमातून आस्थापनांनाच एका छताखाली बोलवून विद्यार्थी-पालकांसाठी माहितीचा खजिना उपलब्ध करून देताच आज पालक व विद्यार्थ्यांची झुंबड उडाली होती. शहरातीलच नव्हे तर देशातील नामवंत संस्था या एस्पायरमध्ये सहभागी झाल्या आहेत. तीन दिवसीय या एज्युकेशन फेअरचा लाभ नागपूरकरांना घेता येणार आहे. विद्यार्थ्यांसह पालकांचीही गर्दी एरवी प्रत्येक शिक्षण संस्थेत जाऊन माहिती घेण्याकरिता प्रयत्न करणारे पालकही या प्रदर्शनात आवर्जून उपस्थित होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबत पालकांनाही करिअरसंदर्भातील मार्गदर्शन थेट तज्ज्ञांकडून मिळत आहे. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर शिक्षणाची योग्य संधी उपलब्ध झाल्याचा आनंद दिसून येत आहे. शैक्षणिक संस्थानाही एकाच छताखाली वेगवेगळ्या क्षेत्रांतील विद्यार्थ्यांशी संवाद साधायला मिळाल्याने त्यांना अडचणी समजावून घेणे शक्य झाले आहे. ‘विद्यार्थ्यांच्या समस्या व समाधानावर’ आज मार्गदर्शन या एस्पायर प्रदर्शनात येणाऱ्या विद्यार्थ्यांना तज्ज्ञाकडून योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी विविध चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. १३ जून रोजी दुपारी ४ वाजता ‘विद्यार्थ्यांच्या समस्या व समाधान’ या विषयावर डॉ. कविता पाटील व मुक्ताई डेब हे मार्गदर्शन करतील.मोबाईल जिंकण्याची रोज संधीया उपक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांकरिता दररोज लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. विजेत्यांना बक्षीसरूपात मोबाईल देण्यात येईल. एस्पायर प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी, रितेश एम. बन, रा. उंटखाना या भाग्यवंताला मोबाईल प्राप्त झाला आहे. विद्यार्थी, पालकांनी भेट द्यावी -आ. सुधाकर कोहळेआ. सुधाकर कोहळे म्हणाले, दहावी, बारावीनंतर पुढे काय करायचे? हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. मात्र लोकमतच्या या एस्पायरने या सारख्या अनेक प्रश्नांचे उत्तर मिळते. येथे आल्यानंतर वेगवेगळ्या कोर्सेसची तसेच खासगी उपयुक्त क्लासेसची माहिती मिळते. विद्यार्थी आणि पालकांनी एकदा तरी भेट द्यावा असा हा उपक्र म आहे.