शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खेळाच्या मैदानांवर पाणी टाक्या बांधण्यापूर्वी आक्षेप मागवा : हायकोर्टाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 19:36 IST

खेळाच्या मैदानांवर पाणी टाक्या बांधण्यापूर्वी नागरिकांकडून आक्षेप मागविण्यात यावेत. त्याकरिता वर्तमानपत्रात नोटीस प्रसिद्ध करावी व संबंधित मैदानांवरही नोटीस लावावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी महापालिकेला दिले.

ठळक मुद्देमनपाला दिला आठ आठवड्यांचा वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खेळाच्या मैदानांवर पाणी टाक्या बांधण्यापूर्वी नागरिकांकडून आक्षेप मागविण्यात यावेत. त्याकरिता वर्तमानपत्रात नोटीस प्रसिद्ध करावी व संबंधित मैदानांवरही नोटीस लावावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी महापालिकेला दिले. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महापालिकेला आठ आठवड्यांचा वेळ देण्यात आला असून त्यानंतर आवश्यक निर्णय घेऊन न्यायालयात अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. खेळाच्या मैदानांवरील अवैध बांधकामांविरुद्ध उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. यापूर्वीच्या आदेशांद्वारे न्यायालयाने खेळाच्या मैदानांवरील अवैध बांधकामे नियमित करण्यास मनाई केली आहे. तसेच, खेळाच्या मैदानांचे संरक्षण करण्यास सांगितले आहे. दरम्यान, महापालिकेने शहरातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी व टंचाईच्या ठिकाणी पाणी पुरवठा करण्याकरिता योजना आणली. त्याअंतर्गत शहरात ४२ पाणी टाक्या बांधल्या जाणार असून त्यापैकी १० टाक्यांसाठी खेळाच्या मैदानांची निवड करण्यात आली आहे. एका पाणी टाकीसाठी ९०० चौरस मीटर जागा लागणार आहे. परिणामी, महापालिकेने खेळाच्या मैदानांवर पाणी टाक्या बांधण्याची परवानगी मिळावी याकरिता न्यायालयात अर्ज सादर केला. त्या अर्जावरील सुनावणीनंतर न्यायालयाने वरील आदेश दिले. तसेच, या आदेशांच्या अंमलबजावणीनंतर परवानगी देण्यावर विचार केला जाईल असे स्पष्ट केले. या प्रकरणात अ‍ॅड. प्रफुल्ल खुबाळकर न्यायालय मित्र असून मनपातर्फे अ‍ॅड. सुधीर पुराणिक यांनी कामकाज पाहिले.पर्यायी जागा देण्यावर उत्तर द्याखेळाच्या मैदानांचे संरक्षण होणे आवश्यक आहे. परंतु, जनहिताच्या दृष्टिकोनातून पाणी टाक्यासाठी मैदानाची जागा द्यावी लागल्यास मनपाने खेळण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यायला पाहिजे असे अ‍ॅड. खुबाळकर यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने हा मुद्दा रेकॉर्डवर घेऊन मनपाला यावर पुढील तारखेपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका