शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

अश्विन मुदगल यांनी स्वीकारला जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 21:01 IST

नागपूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून अश्विन मुदगल यांनी मावळते जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्याकडून गुरुवारी सकाळी पदभार स्वीकारला.

ठळक मुद्देसचिन कुर्वे यांना शुभेच्छा देऊन निरोप

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून अश्विन मुदगल यांनी मावळते जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्याकडून गुरुवारी सकाळी पदभार स्वीकारला.यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र्र खजांजी, उपजिल्हाधिकारी मनीषा जायभाये व इतर अधिकारी उपस्थित होते.मावळते जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी नवे जिल्हाधिकारी यांना पदभाराची सूत्रे देताना शुभेच्छा दिल्या. तसेच नवे जिल्हाधिकारी यांनी पदभार स्वीकारून सचिन कुर्वे यांना शुभेच्छा देत निरोप दिला.मुदगल यांनी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त, २०१४ ते २०१७ दरम्यान सातारा जिल्हाधिकारी, २०१२ ते २०१४ यवतमाळ जिल्हाधिकारी, २००९ ते २०१२ सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, २००९ मध्ये ते पंढरपूर येथे सहायक जिल्हाधिकारी आणि त्यापूर्वी २००७ ते २००९ दरम्यान त्यांनी नाशिक येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. नागपूरचे मनपा आयुक्त म्हणून मुदगल यांचे कार्य विशेष वाखाणण्याजोगे राहिले आहे. हागणदारीमुक्त नागपूर, स्मार्ट सिटी प्रकल्पाला गती देणे, स्वच्छता अभियान, वैयक्तिक १३ हजारावर शौचालये त्यांच्या काळात बांधण्यात आली. अशी अनेक कामे महापालिकेत त्यांच्या कार्यकाळात झाली आहेत.२००३ च्या बॅचचे आयएएस असलेले सचिन कुर्वे यांची मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. ते २५ मे २०१५ रोजी नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले होते.जलयुक्त शिवारसारखे ‘फ्लॅगशिप’ कार्यक्रम प्राधान्याने राबवणारजिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्य शासनाचे जलयुक्त शिवारसारखे विविध ‘फ्लॅगशिप’ कार्यक्रम प्राधान्याने राबवणार असून, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी योग्य नियोजन, मेट्रो प्रकल्पासाठी भूसंपादन, तसेच निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.अधिकारी व जनतेने भरपूर सहकार्य केलेगेल्या तीन वर्षांत राज्य शासनाच्या महत्त्वपूर्ण आणि लोककल्याणकारी योजना, विविध विकासात्मक उपक्रम राबविताना येथील अधिकारी व जनतेने भरपूर सहकार्य केल्याचे मावळते जिल्हधिकारी सचिन कुर्वे यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Nagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालयnagpurनागपूर