शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

आशिष देशमुख काँग्रेसच्या वाटेवर; चव्हाण यांच्याशी दिल्लीत भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 11:09 IST

भाजपवर नाराज असलेले काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी मंगळवारी रात्री दिल्ली येथे काँग्र्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची भेट घेतली.

ठळक मुद्देरणजित देशमुखही उपस्थित होते

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपवर नाराज असलेले काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी मंगळवारी रात्री दिल्ली येथे काँग्र्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत वडील माजी मंत्री रणजित देशमुख हेही उपस्थित होते. या बैठकीत आशिष यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत चर्चा झाल्याची विश्वसनीय माहिती आहे.गेल्या काही दिवसांपासून आशिष देशमुख यांनी उघडपणे भाजपा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. सरकारच्या शेतकरी धोरणाविरोधात ते काटोल येथे उपोषणालाही बसले होते. या नंतर सरकारकडून देशमुखांच्या संस्थांना नोटीसही बजावण्यात आल्या. देशमुख हे भाजपमध्ये अस्वस्थ असून ते सातत्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या भेटी घेत आहे. मंगळवारी रात्री चव्हाण यांच्याशी झालेली भेट त्याच्याच एक भाग होती. मात्र या बैठकीत रणजित देशमुखही उपस्थित असल्यामुळे आता आशिष देशमुख काही तरी अंतिम निर्णय घेतील असे दिसते. दरम्यान नागपुरातील दिल्लीवारीवर असलेल्या काँग्रेस नेत्यांना याभेटीचे साक्षीदार होता आले. त्यामुळे ही गुप्त भेट उजेडात आली. याबाबत आशिष देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता ते फोनवर उपलब्ध होऊ शकले नाही.

टॅग्स :Ashish Deshmukhआशीष देशमुख