नागपूर : महाराष्ट्र राज्य आशा वर्कर्स व गटप्रवर्तक कृती समितीच्यावतीने बेमुदत संप सुरू करण्यात आला आहे. याअंतर्गत संविधान चाैकात आंदाेलन केले जात आहे. मंगळवारी मुसळधार पावसातही आशा सेविका ठामपणे आंदाेलन करीत हाेत्या.
नुकतीच संपाच्या पार्श्वभूमीवर आराेग्यमंत्री राजेश टाेपे यांच्याशी चर्चा करण्यात आली. या बैठकीत एम. ए. पाटील, राजू देसले, राजेंद्र साठे, श्रीमंत घोडके, राजेश सिंह, पद्माकर इंगळे उपस्थित होते. आशा सेविकांच्या अडचणी सांगण्यात आल्या. ४००० रुपये निर्धारित केले असले तरी ते पूर्ण मानधन मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली. काेराेना काळात अनेक महत्त्वाची कामे आशांकडन करून घेण्यात आली पण त्यांच्या कामाचा माेबदला दिला गेला नाही. केंद्र सरकार आशाना फक्त दरमहा एक. हजार रुपये म्हणजे दिवसाला ३३ रु. त रोज ८ ते १२ तास काम करून देत आहे. इतर कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपये प्रोत्साहन भत्ता दरमहा देत आहे. अल्प मानधनावर काम करणाऱ्या आशा व गट प्रवर्तकवर अन्याय का, असा सवाल त्यांनी केला. मात्र आराेग्य मंत्र्यांकडून समाधानकारक आश्वासन न मिळाल्याने बेमुदत संप सुरू करण्यात आला. सीटूतर्फे अध्यक्ष राजेंद्र साठे आणि प्रीती मेश्राम, रंजना पौनीकर, पौर्णिमा पाटील, अंजू चोपडे, मंगला बागडे यांच्या नेतृत्वात आंदोलनात आशा वर्कर्स व गटप्रवर्तक सहभागी आहेत.