शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
7
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
8
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
9
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
10
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
11
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
12
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
13
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
14
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
15
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
16
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
17
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
19
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
20
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा

वॉटर ट्रीटमेंट प्लँट बंद राहणार असल्याने ४ झोनच्या वस्त्यांमध्ये दोन दिवस पाणीपुरवठा ठप्प

By मंगेश व्यवहारे | Updated: February 26, 2024 22:29 IST

२८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजतापासून २९ फेब्रुवारीला दुपारी ४ वाजेपर्यंत शटडाऊन

मंगेश व्यवहारे, नागपूर: कन्हान वॉटर ट्रीटमेंट प्लँटवर ९०० एमएमच्या बटरफ्लाय व्हॉल्व्हचे नूतनीकरण, इनटेक विहिरीच्या आतील ६०० एमएम डक-फूट बेंड बदलविणे व लकडगंज-१ जलकुंभावर ६०० एमएम इनलेट वॉटर पाइपलाइनवर इलेक्ट्रोमॅग्नेटिक एफएमची स्थापना करण्यासाठी महापालिकेने २८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजतापासून २९ फेब्रुवारीला दुपारी ४ वाजेपर्यंत शटडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कन्हान वॉटर ट्रीटमेंट प्लँट १८ तासांसाठी बंद राहणार असल्याने ४ झोनमधील वस्त्यांचा पाणीपुरवठा ठप्प होणार आहे.

आशीनगर झोनमधील बिनाकी व बिनाकी -१, बिनाकी-२ जलकुंभ, उप्पलवाडी एनआयटी जलकुंभ, इंदोरा-१, इंदोरा-२, बेझनबाग, गमदूर, जसवंत जलकुंभातून ज्या वस्त्यांना पाणीपुरवठा होतो, तो होणार नाही. सतरंजीपुरा झोनमधील शांतिनगर, वांजरी-विनोबा भावेनगर, कळमना, बस्तरवारी, बस्तरवार-१, बस्तरवारी -२ जलकुंभाचाही पाणीपुरवठा बाधित होणार आहे. लकडगंज झोनमध्ये भरतवाडा, कळमना, सुभाननगर, मिनीमातानगर, भांडेवाडी, लकडगंज-१, लकडगंज-२, बाबुळबन, पारडी-१, पारडी- २ या जलकुंभाचाही पाणीपुरवठा बाधित होणार आहे, तर नेहरूनगर झोनअंतर्गत नंदनवन, नंदनवन -१, ताजबाग, खरबी, सक्करदरा-३, वाठोडा या जलकुंभाचा पाणीपुरवठा बाधित होणार असून, येथून पाणीपुरवठा होणाऱ्या वस्त्यांनाही दोन दिवस पाणी मिळणार नाही.

टॅग्स :Waterपाणी