शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभागात तब्बल ४०० बोगस नियुक्त्या ? चौकशी समिती गठित करणार

By गणेश हुड | Updated: June 27, 2024 20:34 IST

प्रत्येकी चार ते पाच लाख घेतल्याचा आरोप 

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : हयात नसलेले जिल्हा परिषदेचे  तत्कालीन शिक्षणाधिकारी सोमेश्वर नैताम यांच्या बोगस स्वाक्षऱ्या करून मागील तारखांत आदेश देवून शिक्षण विभागात तब्बल ४०० शिक्षक व कर्मचाऱ्यांना नियुक्त्या देण्यात आल्या. या बोगस नियुक्ती आदेशाला शालार्थ आयडी सुध्दा देण्यात आला. याबाबतचा रेकॉर्ड प्राप्त होताच या प्रकरणाच्या चौकशीसाठी अधिकाऱ्यांची समिती गठित करण्यात येणार असल्याने या घोटाळ्यात सहभागी असलेल्यांचे धाबे दणाणले आहे.

बोगस नियुक्तीसाठी प्रत्येकी चार ते पाच लाखांची रक्क्म घेवून शिक्षण विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी  कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. स्थायी समितीने नियुक्त्याबाबतचा रेकॉर्ड  शिक्षण विभागाला मागीतला आहे. स्थायी समितीच्या पुढील बैठकीत या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती गठित करण्याचे आदेश प्रशासनाला दिले जाणार असल्याची माहिती आहे. 

 विशेष म्हणजे या काळातील आवक-जावक रजिष्टर शिक्षण विभागाकडे उपलब्ध नसल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणात सहभागी कर्मचाऱ्यांनी हे रजिष्टर गहाळ केल्याचा संशय आहे. विशेष म्हणजे शासन मंजुरी नसतानाही संस्था चालकांनी या बोगस नियुक्त्यांच्या आधारे मागील काळातील  शासनाचे कोट्यवधी रुपयांचे वेतन अनुदान लाटले आहे. यासाठी शिक्षण विभागात रॅकेट सक्रीय असून यात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचारी सहभागी असल्याची चर्चा आहे. प्रकरण दडपण्यासाठी काही संस्थाचालक कामाला लागल्याची चर्चा आहे.अधिवेशनात मुद्दा उपस्थित करा  : नागो गाणार यांची मागणीशिक्षण विभागातील बोगस नियुक्त्यांत कोट्यवधींचा गैरव्यवहार झाला आहे. दुसरीकडे शासनाचे कोट्यवधीचे वेतन अनुदान लाटण्यात आले आहे. हा गंभीर मुद्दा असल्याने याबाबतचा मुद्दा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवशेनात उपस्थित करावा, अशी मागणी माजी आमदार नागो गाणार यांनी आमदार चंद्रशेखर बावनकुळे व प्रवीण दटके यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे. तर त्यांनी शिक्षण सचिवांकडे एसआयटी चौकशीची मागणी केली आहे 

टॅग्स :Teacherशिक्षक