शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री राहिलेले अरविंद नेताम संघस्थानी प्रमुख अतिथी

By योगेश पांडे | Updated: June 4, 2025 21:22 IST

अखिल भारतीय पातळीवरील कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीयचा आज रेशीमबागेत समारोप : सरसंघचालक करणार मार्गदर्शन

योगेश पांडे नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय पातळीवरील कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीयचा गुरुवारी रेशीमबाग मैदानावर समारोप होणार आहे. या २५ दिवसीय वर्गाच्या समारोपप्रसंगी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतील. तर माजी केंद्रीय मंत्री अरविंद नेताम हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.

नेताम हे इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय राज्यमंत्री तर पी. व्ही. नरसिंहराव यांच्या कार्यकाळात कृषी राज्यमंत्री मंत्री होते. २०२३ मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम करत छत्तीसगडमध्ये ‘हमार राज’ नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला होता. दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यानंतर संघस्थानी येणारे ते कॉंग्रेसशी संबंधित दुसरे मोठे नेते ठरणार आहे.

नागपुरात २२ मे रोजी कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीयचे उद्घाटन झाले होते. यात देशातील विविध भागातील ८४० स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. या वर्गाच्या समारोपप्रसंगी संघाकडून नामांकित व्यक्तीला प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात येते. २०१८ साली प्रणव मुखर्जी या कार्यक्रमाला आले होते व त्यावरून कॉंग्रेसमधून त्यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले होते. यंदाच्या कार्यक्रमासाठी संघाकडून नेताम यांना निमंत्रण देण्यात आले व त्यांनी त्याचा स्वीकार केला. नेताम हे कॉंग्रेसच्या मुशीतून घडलेले नेते आहे. छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बस्तर भागातील नेते असलेले नेताम हे इंदिरा गांधी तसेच पी.व्ही.नरसिंहराव यांच्या कॅबिनेटमध्ये राज्यमंत्री होते. आदिवासी नेते अशी ओळख असलेल्या नेताम यांनी २०२३ मध्ये कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली व हमरा राज नावाचा पक्ष स्थापन केला होता. ते संघस्थानी येणार असल्याने राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सरसंघचालक काय बोलणार?दरम्यान ऑपरेशन सिंदूर व जातीआधारित जनगणनेची घोषणा या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरसंघचालक काय भाष्य करणार याकडे सामाजिक व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विशेषत: जातीआधारित जनगणनेचे संघाने स्वागत केले असले तरी आकडेवारी गोळा करण्यासाठी ही प्रक्रिया योग्य आहे अशी भूमिका मांडण्यात आली होती.

 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत