शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

'अरुण्यऋषी' चितमपल्ली आणि त्यांची छाया : वडिलांना सांभाळण्यासाठी मुलीने लग्नही केले नाही, पण तीही सोडून गेली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 19:46 IST

निसर्गप्रेमातून लेखन, आणि प्रेमातून समर्पण : चितमपल्ली पिता-पुत्रींची विरळ कथा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मारुती चितमपल्ली यांच्या सेवानिवृत्तीनंतर पत्नीनेच त्यांचा सांभाळ केला. परंतु त्यांचा आजारपणात मृत्यू झाला. तेव्हा त्यांची एकुलती एक मुलगी छाया हिने त्यांचा सांभाळ केला. वयोवृद्ध वडिलांना सांभाळता यावे म्हणून तिने लग्नही केले नाही. परंतु तारुण्यातच अल्पआजारात तीही सोडून गेली.

अरुण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना छाया ही एकुलती एक मुलगी होती. तिने जर्नालिझम केले होते. वडिलांप्रमाणे तिलाही निसर्गाप्रति प्रेम होते. मारुती चितमपल्ली हे सेवानिवृत्तीनंतर लक्ष्मीनगरातील घरी स्थायिक झाले. येथून त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. बहुतांश ग्रंथसंपदा त्यांनी नागपुरातील घरातूनच पूर्ण केली. त्यांची मुलगी छाया हीसुद्धा लिहायची. विशेषतः निसर्गावरच त्यांचे लिखाण अधिक असे. विविध वृत्तपत्रांमधून त्यांचे लेख प्रसिद्ध व्हायचे. निसर्गावरच आधारित त्यांनी एक पुस्तकही लिहिले. मारुती चितमपल्ली यांच्या पत्नीचे आजारपणात निधन झाले. त्यानंतर मुलगी छाया यांनीच चितमपल्ली यांचा सांभाळ केला, त्यांच्या सांभाळ करता यावे म्हणून त्यांनी लग्नही केले नाही. मात्र, अल्पशा आजाराने तारुण्यातच त्यांचाही मृत्यू झाला.

मी त्यांच्या सहवासात समृद्ध झालोमारुती चितमपल्ली यांच्या जाण्याचे अतीव दुःख आहे. लक्ष्मीनगर येथे ते वास्तव्यास असताना त्यांचा मोठा सहवास मला लाभला. ते फार कुणाशी बोलत नसत. प्रत्येक भेटीत ते जंगलातील अनेक अतर्क्स गोष्टी सांगायचे. आमच्या रामटेक येथील कॅपवर येऊन राहण्याची त्यांची खूप इच्छा होती. पण त्यांच्या प्रकृतीमुळे मी त्यांना नेऊ शकलो नाही. नागपूर सोडून ते सोलापूरला जातानाही त्यांना रामटेकला जाता आले नाही. आज तीच खंत मला जाणवत आहे. पण त्याच्या सहवासात मी खरोखर समृद्ध झालो.अमोल खंते, निसर्गप्रेमी

"पद्मश्री मारुती चितमपल्ली सोलापूरचे असले तरी त्यांच्या आयुष्याचा सर्वाधिक काळ विदर्भात गेला आहे. वनाधिकारी म्हणून ते नवेगाव-बांध अभयारण्यात आणि मेळघाटच्या व्याघ्र प्रकल्पात दीर्घकाळ होते. जंगल, जंगलातील गूढ व रहस्यमय जीवन, पशू आणि पक्षी हे त्यांच्या ललितलेखनाचे केंद्र होते. जंगलाकडे पाहण्याचा त्यांना तिसरा डोळा होता आणि अतिसंवेदनशील कान त्यांच्याजवळ होते. म्हणून अत्यंत हळुवार, निसर्गाची घडी न मोडता त्यांनी लिहिलेली पुस्तके मराठीत आगळीवेगळी ठरली. त्यांच्या या लेखनाने मराठी लोकमानस समृद्ध झाले आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली."- प्रमोद मुनघाटे, सदस्य, म. रा. साहित्य व संस्कृती मंडळ

टॅग्स :nagpurनागपूर