शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील कलावंतांची ख्याती जगभर व्हावी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 01:28 IST

विदर्भ ही कलावंतांची खाण आहे. येथील कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळत नसल्यामुळे त्यांना संधी मिळत नाही. व्हाईस आॅफ विदर्भ या स्पर्धेच्या माध्यमातून अशा कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. या माध्यमातून पुढे येणाऱ्या कलावंतांची ख्याती जगभर व्हावी, अशी महापालिकेची प्रामाणिक भूमिका असल्याचे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी शनिवारी केले.

ठळक मुद्देमहापौर : ‘व्हाईस आॅफ विदर्भ’ स्पर्धेचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भ ही कलावंतांची खाण आहे. येथील कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळत नसल्यामुळे त्यांना संधी मिळत नाही. व्हाईस आॅफ विदर्भ या स्पर्धेच्या माध्यमातून अशा कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. या माध्यमातून पुढे येणाऱ्या कलावंतांची ख्याती जगभर व्हावी, अशी महापालिकेची प्रामाणिक भूमिका असल्याचे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी शनिवारी केले.नागपूर महापालिका व लकी इव्हेन्टस अ‍ॅण्ड म्युझिकल एन्टरटेन्मेन्ट यांच्या संयुक्त विद्यमाने एक्सेल इव्हेंटस सोल्युशन्स अ‍ॅन्ड सर्व्हिसेस यांच्या सहकार्याने कविवर्य सुरेश भट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ‘व्हाईस आॅफ विदर्भ’स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला शनिवारी अमृत भवन येथे सुरुवात झाली. उद्घाटन प्रसंगी महापौर बोलत होत्या. यावेळी महापालिकेचे क्रीडा सभापती नागेश सहारे, ज्येष्ठ कलावंत योगेश ठक्कर, पं. जयंत इंदूरकर, सुनील वाघमारे, सारंग जोशी, प्रदीप गोंडाणे, मनिषा देशकर, हर्षल हिवरखेडकर उपस्थित होते.महापौर म्हणाल्या, आजचे युग हे रियालिटी शो चे युग आहे. पण विदर्भातील प्रत्येक कलावंत अशा शो मध्ये पोहचू शकत नाही. अशा कलावंतांना आपल्या शहरात हक्काचे व्यासपीठ देऊन मुंबईपर्यंत पोहचविणे असा या स्पर्धा आयोजनामागचा हेतू आहे. यातून विदर्भाला उदयोन्मुख गायक कलावंत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.प्रारंभी महापौर यांच्याहस्ते करण्यात आले. यानंतर योगेश ठक्कर, पं. जयंत इंदूरकर आदी ज्येष्ठ कलावंतांचा सत्कार करण्यात आला. संचालन लकी म्युझिकल ग्रुपचे संचालक लकी खान यांनी केले.आजही रंगणार प्राथमिक फेरी२२ जुलैला रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळात प्राथमिक फेरी रंगणार आहे. शनिवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यातून प्राथमिक फेरीला कलावंतांनी उपस्थिती लावली. दोन फेऱ्यांमध्ये कलावंतांनी आपल्या गायकीने परिक्षकांना मंत्रमुग्ध केले. १४ वर्षाखालील आणि १४ वर्षावरील अशा दोन गटात ही स्पर्धा होत आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजेत्या ठरणाऱ्या कलावंतांना २१,००० रुपये तर ११,००० रुपये द्वितीय व ७००० रुपये तृतीय असे रोख बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे. ४ आॅगस्टला सुरेश भट सभागृहात अंतिम फेरी होणार आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcultureसांस्कृतिक