शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
3
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
4
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
5
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
6
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
7
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
8
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
9
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
10
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
11
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
12
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
13
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
14
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
15
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
16
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
17
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
18
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
19
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
20
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO

कलावंत मोहन जोशी : ड्रायव्हर ते अभिनेता

By admin | Updated: September 10, 2014 00:49 IST

लहानपणापासूनच नाटकात काम करण्याची आवड होती. त्यामुळे त्यावेळी वडिलांनी नाटकात काम करण्याची परवानगी दिली. याच क्षेत्रात भविष्य करेन, असे मलाही वाटले नव्हते.

कलादालन फाऊंडेशन : हेल्पिंग पीपलतर्फे प्रकट मुलाखत नागपूर : लहानपणापासूनच नाटकात काम करण्याची आवड होती. त्यामुळे त्यावेळी वडिलांनी नाटकात काम करण्याची परवानगी दिली. याच क्षेत्रात भविष्य करेन, असे मलाही वाटले नव्हते. तसे ठरविले नव्हते पण नाटकात काम करण्याचा प्रारंभ १९६६ म्हणजे इयत्ता सहावीत असल्यापासून झाला. नाटक सुरू असताना माझे वाणिज्य पदवीपर्यंतचे शिक्षणही नापास न होता झाले. खूप संघर्ष करावा लागला, असे मला वाटत नाही आणि मी मानतही नाही. बरेवाईट अनुभव प्रत्येकालाच त्याच्या कामात येतात तसेच मलाही आले. काही काळ ड्रायव्हर म्हणून काम केले आणि नंतर या क्षेत्रात स्थिरावलो, असे सांगत ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी आपला प्रवास उलगडला. कलादालन फाऊंडेशन आणि हेल्पिंग पीपलच्यावतीने ‘जीवन से ना हार तू जिनेवाले’ या संकल्पनेवर मोहन जोशी यांची प्रकट मुलाखत आणि जीवनविषयक गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन सायंटिफिक सभागृहात करण्यात आले होते. पदवीधर झाल्यावर पोटापाण्याची सोय व्हावी म्हणून किर्लोस्कर कंपनीत नोकरीला लागलो. पण नाटकाच्या दौऱ्यांसाठी सुट्या लागायच्या आणि त्यासाठी प्रत्येकवेळी खोटे बोलणे अपरिहार्य झाले. एक दिवस माझ्या चुकीने व्यवस्थापकाजवळ माझे बिंग फुटले आणि त्यांनी नोकरी किंवा नाटक यापैकी एक निवडायला सांगितले. मी शांतपणे विचार करून दुसऱ्या दिवशी नोकरीचा राजीनामा दिला. पण नाटकाने पोट भरेल अशी स्थिती नव्हती त्यामुळे स्वत:चा ट्रक घेऊन ड्रायव्हर झालो. आठ वर्षे ड्रायव्हर म्हणून काम केले. अभिनयाच्या क्षेत्रात कुणी गॉडफॉदर नव्हता. माझा पहिलाच मराठी सिनेमा ‘एक डाव भुताचा’ त्यात मला खलनायकाची भूमिका मिळाली. त्यात अभिनेत्री रंजना होत्या. रंजना यांनी अनोळखी खलनायकाला हात लावू देणार नाही, असे सांगितले. मी नवा असल्याने मला सारे ऐकून घ्यावे लागले. हिरो म्हणून काम का केले नाही? असे विचारले असता त्यांनी ‘मी रोज माझा चेहरा आरशात पाहतो’, असे गमतीने उत्तर दिले. पण चरित्र अभिनेत्याच्या भूमिका करतो, असे सांगितले. इंडस्ट्रीत हल्ली कुटुंबासारखे वाटत नाही पण आम्ही आता वयाने वाढलो. त्यामुळे वागण्यात जरा फरकही पडतो, असे ते म्हणाले. त्यांची ही मुलाखत माधवी पांडे यांनी घेतली. या कार्यक्रमाची संकल्पना माधवी पांडे आणि मनीष गायकवाड यांची होती. (प्रतिनिधी)मोठी माणसे तितकीच साधीचित्रपट क्षेत्रात धर्मेन्द्र, अमिताभजी यांची नावे मोठी आहेत. माझ्या आईला धर्मेन्द्र खूप आवडतो. धरमजींसह सिनेमात काम करताना आईची आणि त्यांची भेट घालून दिली. माझी आईचे माहेरचे नाव भावे. ती नागपूरची. धर्मेन्द्र पंजाबचे. नागपुरी हिंदी आणि पंजाबी हिंदीची जुगलबंदी तब्बल दीड तास रंगली. धरमजींनी आईला नृत्यही करून दाखविले. एवढा मोठा कलावंत पण खूप सहजपणे वागला. यावेळी त्यांचे मोठेपण माझ्या लक्षात आले. तर एकदा माझे डबिंग झाल्यावर त्याच स्टूडिओत अमितजींचे डबिंग होते. त्यांच्यासोबतचा एक सिनेमा मी खलनायक म्हणून साईन केला होता. त्यावेळी सिनेमाच्या दिग्दर्शकाने माझी त्यांच्याशी ओळख करून दिली आणि पुढल्या सिनेमात हे खलनायक आहेत, असे त्यांना सांगितले. त्यावेळी अमितजींनी ‘हा हा आप के साथ काम करेंगे...’ त्यांनी असे उपरोधिकपणेच म्हटले, असे मला वाटले आणि मी खूप अस्वस्थ झालो. पण त्यानंतर अनेकांनी त्यांचा मोठेपणा सांगितला आणि मला हायसे वाटले. आता त्यांच्याशी अतिशय चांगले संबंध आहेत, असे मोहन जोशी म्हणाले. सुरेल संगीताचा कार्यक्रममुलाखतीनंतर सुरेल गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. यात प्रमुख गायक सागर मधुमटकेने आपल्या खास अंदाजाने रसिकांची दाद घेतली. बहुतेक किशोरदांची गीते सादर करताना सागरने अनेक गीतात बांगला भाषेचा उपयोग बेमालूमपणे केल्याने रसिकांनी त्याला विशेष दाद दिली. याप्रसंगी सागर, मयंक लखोटिया, अनुजा मेंघळ, श्रद्धा घरोटे यांनी गीते सादर केलीत. संगीत संयोजन मंगेश पटले, राजा राठोड, श्रद्धा घरोटे, श्रीकांत सूर्यवंशी, नंदू गोहाणे यांचे होते. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी किसन पवार यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी जयंत तुपे, टी. के. मन्ना, दिघे, कडू, अमोल सातफळे, रामराव कुंभारे यांचा सत्कार करण्यात आला.