शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या ‘साहेबराव’ला लावणार कृत्रिम पाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 11:43 IST

गोरेवाडा येथील रेस्क्यू सेंटरमध्ये आठ वर्षाचा अपंग वाघ ’साहेबराव’ याला कृत्रिम पाय लावण्याची तयारी गुरुवारी सुरु करण्यात आली.

ठळक मुद्देपायाच्या हाडाला क्रॅक असल्याने होतोय त्रासगोरेवाडा येथील रेस्क्यू सेंटरमध्ये डॉक्टरांची चमू उपचारासाठी सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोरेवाडा येथील रेस्क्यू सेंटरमध्ये आठ वर्षाचा अपंग वाघ ’साहेबराव’ याला कृत्रिम पाय लावण्याची तयारी गुरुवारी सुरु करण्यात आली. यासाठी सकाळी ६.४५ वाजता अस्थिरोगतज्ज्ञ व व्हेटरनरी डॉक्टरांची चमू सज्ज होती. डॉ. गौतम भोजने यांनी वाघाला डॉट मारून बेशुद्ध केले. यानंतर डॉ. विनोद धूत, डॉ. शिरीष उपाध्ये आणि सुश्रुत बाभुळकर यांनी मोबाईल क्ष-किरण मशीनद्वारे वाघाचा एक्स-रे काढला. वाघाच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले.साहेबराव नावाच्या या वाघाला सहा वर्षांपूर्वी ताडोबा जंगलातील पळसगावजवळ शिकाऱ्यांनी लोखंडाच्या ट्रॅपमध्ये फसविले होते. यादरम्यान त्याच्या भावाचा ट्रॅपमध्ये फसल्याने मृत्यू झाला होता. परंतु साहेबरावच्या उजव्या पायातील तीन बोटं तुटली होती. यानंतर त्याला उपचारासाठी महाराज बागेत आणण्यात आले होते. नंतर साहेबरावला गोरेवाडा येथील रेस्क्यू सेंटरमध्ये पाठवण्यात आले. वैद्यकीय तपसणी दरम्यान एफडीसीएमचे प्रबंध निदेशक एन. रामबाबू, मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. आशिष पातूरकर, केंद्राचे संचालक डॉ. बन्नलीकर, विभागीय व्यवस्थापक नंदकिशोर काळे, एसीएफ ए.वी. माडभूषी आदी उपस्थित होते.

त्रास कमी करण्याचा प्रयत्नया अपंग वाघाच्या पायातील तुटलेल्या बोटांमुळे आता त्रास होऊ लागला आहे. त्याचा त्रास कमी करण्यासाठी कृत्रिम पाय लावले जाऊ शकतात. यासाठी डॉक्टरांची चमू प्रयत्न करीत आहे.

पायांच्या हाडांमध्ये ‘क्रॅक ’सूत्रानुसार ‘वाघ’ साहेबराव याचा उजवा पाय लोखंडी ट्रॅपमध्ये फसून गंभीर जखम झाल्याने त्याला गँगरीन होण्याची भीती होती. त्यामुळे उपचारादरम्यान त्याची तीन बोटं कापण्यात आली होती. यानंतर त्याच्या पायाच्या हाडात लहानलहान क्रॅक असल्याचे आढळून आले. यामुळे त्याला चालताना खूप त्रास होत आहे.

टॅग्स :Tigerवाघ