शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कलाविष्काराने रंगली प्राथमिक फेरी

By admin | Updated: October 22, 2014 00:58 IST

क्लासिकल, सेमीक्लासिकल आणि फोक डान्सच्या विविध प्रकारातील स्पर्धेची प्राथमिक फेरी बाल आणि युवकांच्या कलाविष्काराने रंगली. ‘पैंजनिया बोल’ या शीर्षकाखाली घेण्यात आलेल्या

‘पैंजनिया बोल’ला उत्स्फूर्त प्रतिसाद : अंतिम फेरी होणार चुरशीचीनागपूर : क्लासिकल, सेमीक्लासिकल आणि फोक डान्सच्या विविध प्रकारातील स्पर्धेची प्राथमिक फेरी बाल आणि युवकांच्या कलाविष्काराने रंगली. ‘पैंजनिया बोल’ या शीर्षकाखाली घेण्यात आलेल्या या स्पर्धेला कलावंतांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आता सर्वांची नजर अंतिम फेरीकडे लागली आहे.लोकमत कॅम्पस, युवा नेक्स्ट व हार्माेनी इव्हेन्ट्स प्रस्तूत ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. सहा ते चौदा आणि पंधरा ते पन्नास या वयोगटातील तीनशेवर स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. प्राथमिक फेरी असतानाही प्रत्येक कलावंतांच्या नृत्य शैलीचा कस लागला. या स्पर्धेमुळे हल्ली गाजत असलेल्या रॉक डान्स, हिपपॉप, फ्री स्टाईल, डिस्को या गजबजाटात शास्त्रीय नृत्याने आपली ओळख कायम ठेवल्याचे दिसून आले. यात कलावंतांच्या नृत्यातील सच्चेपणा समोर आला. स्पर्धेत सोलो डान्समध्ये प्युअर क्लासिकलमध्ये भरतनाट्यम, कथ्यक, मोहिनीअट्टम, कुचीपुडी, सेमी क्लासिकलमध्ये फिल्मी, भजन, नॉन फिल्मी, ड्युएटमध्ये क्लासिकल, सेमिक्लासिकल आणि फोक डान्स, ग्र्रुपमध्ये क्लासिकल, सेमी क्लासिकल आणि फोक डान्सचा समावेश होता. स्पर्धेच्या सर्वच प्रकारात शंभरवर स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेचे परीक्षण निशा ठाकूर, दीप्ती काळे यांनी केले. संचालन संचालन हार्माेनी इव्हेन्ट्सचे संचालक राजेश समर्थ आणि अंश रंदे या बालकलावंताने केले. अंतिम फेरीची तारीख लवकरच कळविण्यात येईल, अशी माहिती संयोजकांनी दिली आहे. विजेत्यांनी अधिक माहितीकरिता कॅम्पस् क्लब, लोकमत भवन, पं. जवाहरलाल नेहरू मार्ग, रामदासपेठ येथे प्रत्यक्षात किंवा फोन नं. ९९२२९१५०३५ किंवा ९८२२४०६५६२ किंवा ९८२३४६४०८० या क्रमांकावर संपर्क साधावा. (प्रतिनिधी)