शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

कळमन्यात सर्वच बाजारपेठांमध्ये आवक अत्यल्प : सहा दिवस व्यवसाय ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 22:43 IST

मतमोजणीमुळे कळमन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्केड यार्ड चार दिवस बंद होते. या दिवसात बाजारात मालाची आवक आणि खरेदी-विक्री बंद होती. शनिवारपासून व्यवहार सुरू झाले, पण आवक अत्यल्प होती. शनिवारी बँका बंद होत्या, तसेच रविवारी बाजारपेठा पुन्हा बंद राहणार असल्यामुळे व्यवहार सोमवारपासून नियमित सुरू होणार असल्याची माहिती अडतियांनी लोकमतशी बोलताना दिली. एकूण सहा दिवसात कळमन्यातील सहा मुख्य बाजारपेठांमध्ये जवळपास १०० कोटींचा व्यवसाय ठप्प झाल्याचे अडतियांनी सांगितले.

ठळक मुद्देसोमवारपासून आवक सुरू होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मतमोजणीमुळे कळमन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्केड यार्ड चार दिवस बंद होते. या दिवसात बाजारात मालाची आवक आणि खरेदी-विक्री बंद होती. शनिवारपासून व्यवहार सुरू झाले, पण आवक अत्यल्प होती. शनिवारी बँका बंद होत्या, तसेच रविवारी बाजारपेठा पुन्हा बंद राहणार असल्यामुळे व्यवहार सोमवारपासून नियमित सुरू होणार असल्याची माहिती अडतियांनी लोकमतशी बोलताना दिली. एकूण सहा दिवसात कळमन्यातील सहा मुख्य बाजारपेठांमध्ये जवळपास १०० कोटींचा व्यवसाय ठप्प झाल्याचे अडतियांनी सांगितले.कोट्यवधींचे व्यवहार ठप्पलोकसभा निवडणुकीची मतमोजणी समितीच्या मार्केट यार्डमध्ये २३ मे रोजी पार पडली. पण कायदा आणि सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक अधिकारी अणि जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी मार्केट यार्ड २१ मेच्या सायंकाळी ७ पासून २४ मेच्या सायंकाळपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्याकरिता बाजारात सुरक्षा यंत्रणातैनात करण्यात आली होती. बाजारात गाड्या जाण्यावर बंदी होती. बंदची माहिती शेतकरी, ग्राहक आणि विक्रेत्यांना कळविण्यात आल्यानंतर त्यांनी २१ मेपासून बाजारात मालाची आवक बंद केली. जवळपास सहा दिवसात खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद राहिल्यामुळे कोट्यवधींचे व्यवहार ठप्प राहिल्याची माहिती अडतियांनी दिली.दररोज दीड लाख पोती धान्य, कडधान्याच्या विक्रीला फटकाकळमन्यात उन्हाळ्यात धान्याचा हंगाम असतो. या दिवसात दररोज १० हजार पोती हरभरा, चार हजार पोती तूर, दोन हजार पोती सोयाबीन आणि जवळपास ८ ते १० हजार पोती गहू अशी एकूण २४ ते २५ हजार पोती धान्य व कडधान्याची विक्री होते. या सहा दिवसात दीड लाख पोत्यांची विक्री झाली नाही. त्यामुळे शेतकरी आणि विक्रेत्यांना नुकसान सोसावे लागले. शनिवारी धान्य बाजार सुरू झाल्यानंतर शेतकरी आणि ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरविली. व्यवहार सोमवारपासून पूर्ववत होतील, असे धान्य बाजाराचे विक्रेते व अडतिये कमलाकर घाटोळे यांनी दिली.भाजी बाजारात आवक, पण ग्राहक कमीकळमन्यात धान्य, फळे, मिरची, आलू-कांदे, भाजीपाला, न्यू ग्रेन आदी सहा मुख्य बाजारपेठा आहेत. भाजीपाला बाजारात आवक रात्रीपासून सुरू होते. पण मार्केट यार्ड २४ मे सायंकाळपर्यंत बंद राहिल्यामुळे शनिवार, २५ मे रोजी हव्या त्या प्रमाणात भाजीपाला आला नाही. स्थानिकांकडून आवक होती, पण त्या प्रमाणात ग्राहक नव्हते. त्यामुळे सर्वच भाज्यांचे भाव कमी झाले होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९businessव्यवसाय