शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

आगमनाअगोदरच नागपुरकरांना गणराया पावला : १५ सप्टेंबरपर्यंत नियमित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 22:14 IST

गणेशोत्सवाच्या तोंडावर नागपुरकरांसाठी एक चांगली बातमी आहे. तोतलाडोह जलाशयातील पाणीपातळीमध्ये झालेली वाढ व गणेशोत्सवाचा कालावधी लक्षात घेता महानगरपालिका प्रशासनाने १५ सप्टेंबरपर्यंत नियमित पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देगणेशोत्सवात पाणीकपात नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणेशोत्सवाच्या तोंडावर नागपुरकरांसाठी एक चांगली बातमी आहे. तोतलाडोह जलाशयातील पाणीपातळीमध्ये झालेली वाढ व गणेशोत्सवाचा कालावधी लक्षात घेता महानगरपालिका प्रशासनाने १५ सप्टेंबरपर्यंत नियमित पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. मनपाचे पदाधिकारी व जलप्रदाय विभागामध्ये झालेल्या चर्चेनंतर पाणीकपात टाळण्याचा निर्णय घेण्यात आला.१५ जुलै ते ३१ ऑगस्टपर्यंत शहरातील ७० टक्के भागात आठवड्यातील तीन दिवस पाणीकपात करण्यात आली. तर कन्हान जलशुद्धीकरण केंद्रातून नेहरुनगर, सतरंजीपुरा, लकडगंज आणि आसीनगरच्या काही भागांमध्ये नियमित पाणीपुरवठा सुरू होता. पेंचमध्ये पाणी नसल्याने पाणीकपात करण्यात येत होती.३१ ऑगस्ट रोजी पाणीकपातीसंदर्भात समिक्षा होणार होती. परंतु मनपा प्रशासनातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी सर्वसंमतीने गणेशोत्सवादरम्यान पाणीकपात टाळण्याचा निर्णय घेतला.मध्य प्रदेशातील चौराई डॅममधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे तोतलाडोह जलाशयाची पातळी मागील वर्षीपेक्षा चांगली आहे. मात्र हे प्रमाण समाधानकारक नाही. परंतु गणेशोत्सवादरम्यान शहरवासीयांना पाणी मिळावे यासाठी पाणीकपात करण्याचा निर्णय काही दिवसांसाठी स्थगित करण्यात येत आहे. त्यानंतर पाण्याचा साठा पाहून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी दिली. पाणीकपात बंद करण्याच्या निर्णयाला निवडणूकींसाठी जोडले जाऊ शकत नाही. तोतलाडोहमध्ये मागील आठवड्यापर्यंत पाणी एकदमच खालच्या पातळीवर होते. पाणीच नव्हते त्यामुळे पुरवठा नव्हता, असेदेखील त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला स्थायी समिति अध्यक्ष प्रदीप पोहाणे, नगरसेवक दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, दिव्या धुरडे उपस्थित होते.४३ दिवसांत वाचविले ७.५२ एमएमक्यूब पाणीपाणीकपातीमुळे मनपाच्या जलप्रदाय विभागाने ७.५२ एमएमक्यूब पाण्याची बचत केली. येत्या काळात पाणीसंकट वाढणार आहे. त्यामुले भविष्यातील आवश्यकता लक्षात घेऊन पावले उचलावी लागतील. १५ सप्टेंबरपर्यंत आचारसंहिता लागली तर मनपा प्रशासन, आयुक्त स्वत:च्या पातळीवर पाणीकपातीबाबत निर्णय घेतील, असे पिंटू झलके यांनी सांगितले.पाणीसाठा वाढलामध्यप्रदेशच्या चौराई डॅममधून मागील दिवसांत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे तोतलाडोह जलाशयाची पातळी वाढली आहे. सद्यस्थितीत येथे ३२.७३ टक्के अर्थातच ३३२.८६ एमएमक्यूब पाणी आहे. तर मृतसाठा पकडून येथे एकूण ४८२.८४ एमएमक्यूब पाणी आहे. मागील वर्षी या कालावधीत तोतलाडोह येथे २४.९३ एमएमक्यूब पाणीच होते. परंतु नवेगाव खैरी येथे मात्र पाणीपातळी वाढलेली नाही. मागील वर्षी तेथे ३८.०५ टक्के पाणी होते. यंदा हे प्रमाण २८.९२ टक्के इतकेच आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाWaterपाणी