लाेकमत न्यूज नेटवर्क
बुटीबाेरी : सातगाव (ता. नागपूर ग्रामीण) येथील बंद असलेल्या हाॅटेलमध्ये रमी खेळण्यासाठी गेलेल्या तरुणाला चाैघांनी अडविले आणि त्याच्यावर बंदूक राेखून त्याच्याकडील पाच हजार रुपये हिसकावून घेतले. त्यांनी हवेत गाेळीबार करीत पळ काढला. या प्रकरणात बुटीबाेरी पाेलिसांनी चार आराेपींना अटक केली असून, त्यांच्याकडून एकूण ६ लाख ८०० रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. ही कारवाई रविवारी (दि. ९) करण्यात आली.
मोहसिन अब्दुल रहमान बेरा (३६, रा. जुनी वस्ती बुटीबोरी), सुरेंद्रकुमार रामपती यादव ( ३४, रा. अशोकनगर जिल्हा कानपूर, उत्तर प्रदेश), आशुतोषराज गौतम सत्येंद्र मिश्रा (२५, रा. दीपिका ता. कटदोरा, जिल्हा कोरबा, छत्तीसगड) व अंकित रमेश शुक्ला (३६, रा. आधारखेडा, लखनौ, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. यातील सुरेंद्रकुमार, आशुताेषराज व अंकित हे परप्रांतीय असले तरी ते काही वर्षांपासून नागपूर शहरातील नंदनवन भागात राहतात.
हर्षल विनाेद पिंपळकर (२६, रा. फ्रेन्डस काॅलनी, बुटीबाेरी) हा रविवारी (दि. ३) सातगाव येथील बंद हाॅटेलमध्ये रमी खेळण्यासाठी गेला हाेता. ताे आत प्रवेश करताना चाैघांनी त्याला अडविले आणि त्याच्यावर बंदूक राेखून त्याच्याकडील पाच हजार रुपये हिसकावून घेतले. त्या आराेपींनी हवेत गाेळीबार केल्यानंतर कारने पळ काढला. याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी भादंवि ३९२, ३४२, ४५२, ३४ अन्वये गुन्हा नाेंदवून प्रकरण तपासात घेतले.
या प्रकरणात माेहसिन सहभागी असल्याचे कळताच पाेलिसांनी आधी त्याला ताब्यात घेत विचारपूस केली. त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदारांची नावेही सांगितली. त्यामुळे पाेलिसांनी उर्वरित तिघांना नागपूर शहरातील नंदनवन भागातून ताब्यात घेत सर्वांना अटक केली. शिवाय, त्यांच्याकडून कार व इतर साहित्य असा एकूण ६ लाख ८०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती बुटीबाेरीचे ठाणेदार ओमप्रकाश कोकाटे यांनी दिली. ही कामगिरी सहायक पाेलीस निरीक्षक माणिक चौधरी, सतीश सोनटक्के, उपनिरीक्षक आशिष मोरखेडे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.
....
तीन दिवसाची पाेलीस काेठडी
या चारही आराेपींना न्यायालयाने तीन दिवसाची पाेलीस काेठडी सुनावली आहे, अशी माहिती पाेलीस निरीक्षक ओमप्रकाश काेकाटे यांनी दिली. त्यांच्याकडून एमएच-४९/बीबी-७९८८ क्रमांकाची कार, देशी गावठी बंदूक, १२ जिवंत काडतूस, देशीकट्टा, पाच माेबाईल हॅण्डसेट, चाकू व पाच हजार रुपये राेख असा एकूण ६ लाख ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ओमप्रकाश काेकाटे यांनी दिली. त्यांच्याकडून लुटमारीच्या इतर घटना उघड हाेण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.