पारशिवनी : अल्पवयीन मुलीला पैशाचे आमिष देऊन आराेपीने तिचा विनयभंग केला. ही घटना पारशिवनी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव (जाेशी) येथे शनिवारी (दि. २) दुपारी घडली. पीडित मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून पाेलिसांनी आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदवून, त्यास अटक केली आहे.
स्वप्निल रामजी उईके (वय २२, रा. दहेगाव (जाेशी), ता. पारशिवनी) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. पीडित मुलीच्या घरी दुकान असून, शनिवारी पीडितेचे आईवडील व भाऊ दुकान बंद करून शेतावर गेले हाेते. दरम्यान, दुपारी १२.४५ वाजताच्या सुमारास आराेपीने दुकानावर येऊन पास्त्याची मागणी केली. पास्त्याचे १० रुपये देऊन पाच रुपये परत घेतले. मुलगी एकटी पाहून आराेपीने आईवडील कुठे गेले, असे विचारले. मुलीने ते कामाला गेल्याचे सांगितले. अशात आराेपीने मुलीला २० रुपयांचे आमिष दाखवून तिच्याकडे शरीर संबंधाची मागणी केली. शिवाय, आराेपीने पीडितेचा हात पकडून विनयभंग केला. पीडित मुलगी जाेरात ओरडल्याने आराेपी पळून गेला. आईवडील घरी आल्यानंतर मुलीने सर्व हकिकत सांगितली. त्यानंतर सायंकाळी पीडितेच्या आईवडिलांनी पाेलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
याप्रकरणी पारशिवनी पाेलिसांनी आराेपीविरुद्ध भा.दं.वि. कलम ३५४ (अ), पाेक्साे अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीस अटक केली आहे. उपविभागीय पाेलीस अधिकारी नयन आलूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पाेलीस निरीक्षक संताेष वैरागडे करीत आहेत.