नागपूर : मोक्षधाम परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच आरोपींना गणेशपेठ पोलिसांनी अटक केली.
हर्षल केशवराव मादाळे (२५, रा. रामकुलर चौक), प्रेमचंद ऊर्फ राहुल मोरेश्वर गावरकर (२०, रा. कुंभारपुरा), शेख इमरान ऊर्फ भऱ्या गुलाम अहमद (२८, रा. माॅडेल मिल चाळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सय्यद अली ऊर्फ मुन्ना गोटी ऊर्फ तिनपत्ती (४५, रा. बजेरीया) व रितिक राजकुमार गौर (२५, रा. बजेरीया) हे आरोपी पोलिसांच्या हातून निसटले व पळून गेले. अटक केलेल्या आरोपीजवळून दरोडा टाकण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू जप्त करण्यात आल्या.
-------------
महिलेने घेतला गळफास
नागपूर : बाबा दीपनगर, नारी येथील ३४ वर्षीय महिलेने राहत्या घरी गळफासघेऊन आत्महत्या केली. प्रेमा रमेश ऊईके असे मृत महिलेचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजता राहत्या घरी गळफास घेतला. कपिलनगर पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.
-------------
मजुराचा मृत्यू
नागपूर : एमआयडीसी परिसरातील टाईल्स कंपनीत काम करीत असलेल्या एका मजुराचा मृत्यू झाला. गुलाब नारायण चौखे (४८) रा. हिंगणा कस्बा असे मृत मजुरकाचे नाव आहे. मंगळवारी दुपारी ३ वाजता काम करीत असताना तो अचानक खाली पडला. त्याला उपचारासाठी लता मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले.उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.
-----------------