शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

लष्कराच्या पेपरचा सौदा १.३५ कोटीत

By admin | Updated: February 27, 2017 01:52 IST

देशातील विविध परीक्षा केंद्रांवर रविवारी घेतल्या जाणाऱ्या लष्कराच्या परीक्षेचा लेखी पेपर फोडण्यासाठी

रवींद्रकुमारने घेतली होती पेपर फोडण्याची सुपारी शिंदे गोळा करणार होता १० कोटी उपराजधानीत खळबळ नागपूर : देशातील विविध परीक्षा केंद्रांवर रविवारी घेतल्या जाणाऱ्या लष्कराच्या परीक्षेचा लेखी पेपर फोडण्यासाठी (लीक करण्यासाठी) रवींद्रकुमार नामक आरोपीने आरोपी संतोष शिंदे याच्यासोबत १ कोटी ३५ लाख रुपयांचा सौदा केला होता, अशी खळबळजनक माहिती पुढे आली आहे. हा पेपर व्हॉटस्अ‍ॅपवर मिळवल्यानंतर त्याबदल्यात उमेदवारांकडून ८ ते १० कोटी रुपये गोळा करण्याचे शिंदेचे मनसुबे होते. आरोपी संतोष शिंदे हा फलटण (जि. सातारा) येथे छत्रपती अकादमीच्या नावाखाली सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र चालवतो. अशाच प्रकारे देशातील विविध प्रांतात सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र चालविणाऱ्या अनेक संचालकांसोबत शिंदेची ओळख आहे. रवींद्रकुमार लष्करात लिपिक असल्याचे शिंदेने पोलिसांना सांगितल्याचे समजते. त्यानेच लष्कराच्या शारीरिक चाचण्यांमध्ये उत्तीर्ण झालेल्या आणि लेखी परीक्षेला पात्र ठरलेल्या उमेदवारांचे नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक शिंदेला दिल्याचा संशय आहे. या आधारेच शिंदे आणि त्याच्या रॅकेटमधील साथीदारांनी आपापल्या भागातील उमेदवारांशी संपर्क केला. रविवारी, २६ फेब्रुवारीला विविध परीक्षा केंद्रांवर दिला जाणारा पेपर तुम्हाला काही तासांपूर्वीच सांगितला जाईल. ही परीक्षा पास केल्यानंतर तुम्हाला थेट लष्करात नोकरी मिळेल. त्यामुळे परीक्षेपूर्वीच पेपर माहीत करून घ्यायचा असल्यास चार लाख रुपये द्यावे लागतील, असा निरोप रॅकेटमधील आरोपी संबंधित उमेदवाराला देत होते. त्यानंतर घासाघीस व्हायची. कुणी तीन तर कुणी दोन लाख, कुणी एक लाख आणि फारच गरीब असलेल्या विद्यार्थ्यांकडून किमान ८० हजार रुपये घेतले जायचे. नागपुरात हाती लागलेल्या २३० उमेदवारांकडून किमान ८० हजार तर कमाल चार लाख रुपयात शिंदे आणि त्याच्या साथीदारांनी सौदा केला होता. अशाच प्रकारचा सौदा पुणे, ठाणे, पणजी (गोवा) आणि गुजरातमधील एका सेंटरचा झाला होता. सैन्य दलाच्या परीक्षेचा पेपर फोडण्याचा दावा करणाऱ्या टोळीतील जयकुमार बेलखोडे याला दुसऱ्यांदा अटक झालेली आहे. बेलखोडेचे कोंढाळी-काटोलजवळ टँगो चार्ली प्रशिक्षण केंद्र आहे. सैन्य दलात भरती होण्यास इच्छुक असणाऱ्यांना तो भरतीपूर्व प्रशिक्षण देण्याचा दावा करतो. केवळ प्रशिक्षणाचाच नव्हे तर सैन्य दलाच्या लेखी परीक्षेत पास करून देण्याचाही तो दावा करतो. लष्करातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपले व आपल्या साथीदारांचे घनिष्ठ संबंध असल्याची बतावणी करून परीक्षेपूर्वीच आपल्याला पेपर माहीत होते, असाही त्याचा दावा आहे. नोकरीच्या आमिषापोटी त्याच्या बतावणीला बळी पडलेले उमेदवार त्याच्याकडे लाखो रुपये देतात. दोन वर्षांपूर्वी त्याने असाच दावा केला होता अन् शेकडो विद्यार्थ्यांकडून कोट्यवधी रुपये गोळा केले होते. त्यानंतर नागपुरात सैन्य दलाच्या लेखी परीक्षेचा पेपर सुरू झाला अन् ऐन परीक्षा सुरू असताना सीबीआयचे तत्कालीन अधीक्षक संदीप तामगाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत खराबे, प्रदीप लांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परीक्षा केंद्रावर छापा मारला होता. त्यावेळी बेलखोडेला साथीदारांसह अटक करून त्याच्या केंद्राला सील करण्यात आले होते. या कारवाईमुळे देशभरात खळबळ उडाली होती. लष्कराच्या मुख्यालयातील शीर्षस्थ अधिकाऱ्यांनी नागपूर गाठून सीबीआयकडून या कारवाईचा अहवाल घेतला होता. अटक करण्यात आलेल्या टँगो चार्लीचा बेलखोडे आणि त्याच्या साथीदारांकडूनही महत्त्वाची माहिती घेतली होती. या प्रकरणाचे धागेदोरे गांभीर्याने तपासले गेले नसल्याने किंवा कडक कारवाई झाली नसल्याने शिंदे-बेलखोडे आणि त्यांच्यासारख्या दलालांनी थेट लष्करात दाखल होण्यापूर्वीपासूनच भ्रष्टाचाराची बीज रोवण्याचे पाप सुरूच ठेवले.(प्रतिनिधी) सैन्य दलाच्या परीक्षेचा पेपर फोडण्याचा दावा करणाऱ्या टोळीतील जयकुमार बेलखोडे याला दुसऱ्यांदा अटक झालेली आहे. बेलखोडेचे कोंढाळी-काटोलजवळ टँगो चार्ली प्रशिक्षण केंद्र आहे. सैन्य दलात भरती होण्यास इच्छुक असणाऱ्यांना तो भरतीपूर्व प्रशिक्षण देण्याचा दावा करतो. केवळ प्रशिक्षणाचाच नव्हे तर सैन्य दलाच्या लेखी परीक्षेत पास करून देण्याचाही तो दावा करतो. लष्करातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपले व आपल्या साथीदारांचे घनिष्ठ संबंध असल्याची बतावणी करून परीक्षेपूर्वीच आपल्याला पेपर माहीत होते, असाही त्याचा दावा आहे. नोकरीच्या आमिषापोटी त्याच्या बतावणीला बळी पडलेले उमेदवार त्याच्याकडे लाखो रुपये देतात. दोन वर्षांपूर्वी त्याने असाच दावा केला होता अन् शेकडो विद्यार्थ्यांकडून कोट्यवधी रुपये गोळा केले होते. त्यानंतर नागपुरात सैन्य दलाच्या लेखी परीक्षेचा पेपर सुरू झाला अन् ऐन परीक्षा सुरू असताना सीबीआयचे तत्कालीन अधीक्षक संदीप तामगाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत खराबे, प्रदीप लांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परीक्षा केंद्रावर छापा मारला होता. त्यावेळी बेलखोडेला साथीदारांसह अटक करून त्याच्या केंद्राला सील करण्यात आले होते. या कारवाईमुळे देशभरात खळबळ उडाली होती. लष्कराच्या मुख्यालयातील शीर्षस्थ अधिकाऱ्यांनी नागपूर गाठून सीबीआयकडून या कारवाईचा अहवाल घेतला होता. अटक करण्यात आलेल्या टँगो चार्लीचा बेलखोडे आणि त्याच्या साथीदारांकडूनही महत्त्वाची माहिती घेतली होती. या प्रकरणाचे धागेदोरे गांभीर्याने तपासले गेले नसल्याने किंवा कडक कारवाई झाली नसल्याने शिंदे-बेलखोडे आणि त्यांच्यासारख्या दलालांनी थेट लष्करात दाखल होण्यापूर्वीपासूनच भ्रष्टाचाराची बीज रोवण्याचे पाप सुरूच ठेवले.(प्रतिनिधी)