शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

अर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पाशिनयान यांची नागपुरात अल्पविश्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 22:01 IST

अर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पाशिनयान हे आज हनोई (व्हिएतनाम) येथून अर्मेनियाकडे परतण्यापूर्वी नागपूर विमानतळावर उतरले. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी त्यांचे नागपूर विमानतळावर पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, उपजिल्हाधिकारी शिरीष पांडे आणि पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित उपस्थित होते.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी मुदगल यांच्याकडून स्वागत : पोलीस आयुक्तांनीही केली चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पाशिनयान हे आज हनोई (व्हिएतनाम) येथून अर्मेनियाकडे परतण्यापूर्वी नागपूर विमानतळावर उतरले. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी त्यांचे नागपूर विमानतळावर पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, उपजिल्हाधिकारी शिरीष पांडे आणि पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित उपस्थित होते.व्हिएतनामला जाण्यापूर्वी ४ जुलैला पंतप्रधान निकोल पाशिनयान येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर थांबले होते. त्यांनी जिल्हाधिकारी मुदगल यांच्याकडून नागपूरच्या प्रगतीचा आलेख समजून घेतला होता. येथील प्रशासकीय रचना आणि प्राप्तीचे स्रोतही त्यांनी जिल्हाधिकारी मुदगल यांच्याकडून समजून घेतले होते. तर, येथील गुन्हेगारी आणि कम्युनिटी पुलिसिंगबाबत त्यांना पोलीस आयुक्तांनी माहिती सांगितली होती. आज आपल्या देशात परत जाताना ते पुन्हा नागपूर विमानतळावर सायंकाळी ५.३० वाजता उतरले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अ‍ॅन्ना हाकोबयान, विदेश मंत्रालयाचे उपमंत्री अव्हेट अ‍ॅडोन्टस, उच्च तंत्र उद्योगमंत्री हाकोब अर्शाक्यान, अर्थमंत्री आणि पत्रकारांचे प्रतिनिधीमंडळ होते. राजशिष्टाचाराप्रमाणे जिल्हाधिकारी मुदगल यांनी पंतप्रधान पाशिनयान यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी मुदगल आणि पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी त्यांच्याशी चर्चा केली. दीड तासाच्या विश्रांतीनंतर रात्री ७ वाजता त्यांनी आपल्या प्रतिनिधी मंडळासह नागपूर विमानतळावरून मायदेशी जाण्यासाठी प्रयाण केले.

टॅग्स :prime ministerपंतप्रधानDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर