शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुन सिबल यांना रेल्वेमंत्र्यांचा पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 01:26 IST

भारतीय रेल्वेत दरवर्षी आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना रेल्वे बोर्ड स्तरावर रेल्वे मंत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावेळी भोपाळ येथे झालेल्या राष्ट्रीय रेल्वे पुरस्कार समारंभात दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे माजी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आणि सध्याचे वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक अर्जुन सिबल यांना रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वेमंत्री पुरस्कार देऊन सन्मानित केले.

ठळक मुद्देभारतीय रेल्वे क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी

 

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भारतीय रेल्वेत दरवर्षी आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना रेल्वे बोर्ड स्तरावर रेल्वे मंत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावेळी भोपाळ येथे झालेल्या राष्ट्रीय रेल्वे पुरस्कार समारंभात दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे माजी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आणि सध्याचे वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक अर्जुन सिबल यांना रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वेमंत्री पुरस्कार देऊन सन्मानित केले. यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्विनी लोहानी, बोर्डाचे सदस्य आणि सर्व झोनचे महाव्यवस्थापक उपस्थित होते. अर्जुन सिबल यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमित कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर विभागात नवा रेकॉर्ड बनविला आहे. त्यांच्या नेतृत्वात विभागाने प्रवासी भाड्यात मागील वर्षीच्या तुलनेत ७.५२ टक्के वाढ केली आहे. मालभाड्याचे लक्ष्यही १० टक्के अधिक पूर्ण केले आहे. वाणिज्य प्रचार, खानपान, पार्किंग, तिकीट तपासणीतून होणारे उत्पन्नही वाढले. त्यांनी दृष्टिहीन प्रवाशांसाठी ब्रेल लिपी सिस्टीम, दिव्यांग आणि ज्येष्ठ प्रवाशांसाठी पोर्टेबल रॅम्प, वेटींग हॉल, किड्स कॉर्नर आदी सुविधा रेल्वेस्थानकावर उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या प्रयत्नामुळे गरहा स्टेशनवरून मालभाडे वाहतुकीची सुरुवात होऊन रेल्वेला ४.९१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले.

 

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरnagpurनागपूर