शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

आर्वीतील महिलेची नागपुरात आत्महत्या : मित्राकडून अपेक्षाभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 20:08 IST

आर्वी (जि. वर्धा) येथील एका महिलेने मित्र-प्रेमात अपेक्षाभंग झाल्याने विष प्र्राशन करून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी महाराजबागजवळ घडली.

ठळक मुद्देघेतले विष, महाराजबागजवळची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आर्वी (जि. वर्धा) येथील एका महिलेने मित्र-प्रेमात अपेक्षाभंग झाल्याने विष प्र्राशन करून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी महाराजबागजवळ घडली. आरती भगत (वय २६) असे मृत महिलेचे नाव आहे.आरती मूळची आर्वी येथील रहिवासी होती. गेल्या काही दिवसांपासून ती लता मंगेशकर हॉस्पिटल मार्गावरील आंबेडकर वॉर्डात राहत होती. तिला दोन मुले आहेत. पहिल्या पतीसोबत पटत नसल्याने तिने दुसऱ्या एका तरुणासोबत संबंध जोडले होते. या तरुणाकडे तिने लग्नासाठी तगादा लावला होता. तो टाळत असल्याने ती संतप्त झाली होती. तिने शुक्रवारी सकाळी ११.३० च्या सुमारास तिच्या मित्राला महाराजबागजवळ भेटायला बोलविले. तिने पुन्हा त्याच्याजवळ लग्नाचा विषय काढला. त्याने लग्नास नकार दिल्याने तिने आत्महत्येची धमकी दिली. मित्राने ती गंमत करत असावी असे समजून तिच्याकडे दुर्लक्ष केले. तो दुर्लक्ष करीत असल्याचे जाणवल्याने निराश झालेल्या आरतीने सोबत आणलेले कीटकनाशक प्राशन केले. तिच्या तोंडातून फेस येत असल्याचे पाहून मित्राने तिला लगेच मेडिकलमध्ये दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना शनिवारी पहाटे २.३० च्या सुमारास डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान, मेडिकलमधील पोलीस केंद्रातून सूचना मिळाल्याने सीताबर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

 

टॅग्स :Suicideआत्महत्याnagpurनागपूर