शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

एकाच परिचारिकेच्या नावाने तब्बल ३४ कर्ज प्रकरणे मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 10:27 IST

Nagpur News भंडारा जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेने परिचारिका नीलिमा शेंडे यांच्या नावाने तब्बल ३४ कर्ज प्रकरणे मंजूर केली आहेत. परंतु, शेंडे यांनी प्रत्यक्षात केवळ दाेनदाच कर्ज घेतले आहे.

ठळक मुद्देउच्च न्यायालयात याचिका

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भंडारा जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेने परिचारिका नीलिमा शेंडे यांच्या नावाने तब्बल ३४ कर्ज प्रकरणे मंजूर केली आहेत. परंतु, शेंडे यांनी प्रत्यक्षात केवळ दाेनदाच कर्ज घेतले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. तसेच, पुढील आदेशापर्यंत शेंडे यांच्या वेतनातून विवादित कर्जाची वसुली करण्यास मनाई केली आहे आणि जिल्हा परिषद व पतसंस्थेला यावर उत्तर सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत.

यासंदर्भात शेंडे यांनी याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. केवळ दोन कर्ज घेतले असताना तब्बल ३४ कर्ज नावावर असल्याचे कळल्यानंतर शेंडे यांना धक्का बसला. त्यामुळे त्यांनी जिल्हा परिषद व पतसंस्थेकडे वेळोवेळी तक्रारी केल्या. परंतु, त्यांचे समाधान करण्यात आले नाही. परिणामी, त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. वर्तमान मासिक उत्पन्नाच्या आधारावर ३४ कर्ज प्रकरणे मंजूरच केली जाऊ शकत नाही. त्यामुळे कर्ज मंजुरीत घोटाळा झाल्याचे स्पष्ट होते. करिता, विवादित कर्जांची वसुली रद्द करण्यात यावी, असे त्यांचे म्हणणे आहे. शेंडे यांच्यातर्फे ॲड. अविनाश रामटेके यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालय