शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या कर्करुग्णांसाठी 'लिनीअर ॲक्सेलेटर' यंत्राची मंजुरी; सात वर्षांची प्रतीक्षा संपली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 14:46 IST

Nagpur : ३५ कोटी ८२ लाख रुपयांमधून खरेदी केली जाणारा कॅन्सरवरील यंत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय a रुग्णालयातील (मेडिकल) कॅन्सरबाधित गरीब रुग्णांवरील उपचारासाठी मागील सात वर्षांपासून रखडलेल्या 'लिनीअर अॅक्सेलेटर' यंत्राचा खरेदीचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसून येते. सरकारने या यंत्राच्या वाढीव निधीला मंजुरी दिली आहे. आता हे यंत्र ३५ कोटी, ८२ लाख ६४ हजार रुपयांमधून खरेदी केले जाणार आहे.

कॅन्सरच्या उपचारात महत्त्वाचे मानले जाणारे 'लिनीअर अॅक्सेलेटर' मेडिकलमध्ये नसल्याने रुग्णांना २० वर्षे जुनाट व कालबाह्य झालेल्या कोबाल्ट मशीनवरूनच जीवघेणे रेडिएशन घ्यावे लागत आहे. नवे अद्ययावत 'लिनीअर अॅक्सलेटर' यंत्राच्या खरेदीसाठी मेडिकलच्या कॅन्सर विभागाचे तत्कालिन प्रमुख डॉ. कृष्णा कांबळे यांना आंदोलन करावे लागले. परिणामी, मार्च मार्च २०१८ मध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून २० कोटी तर आदिवासी विकास विभागाकडून ३ कोटी २० लाख असे, २३ कोटी २० लाखांचा निधी मंजूर झाला. परंतु पूर्वीच्या हाफकिन महामंडळाकडून मागील सात वर्षे यंत्राची खरेदीच झाली नाही. 

दरम्यान, विदर्भातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांच्या विकासासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आल्याने कॅन्सर रुग्णांच्या उपचारासंदर्भात प्रश्न उपस्थित झाले, त्यामुळे या यंत्राच्या खरेदीचे आदेश न्यायालयाने दिले होते परंतु खरेदी प्रक्रिया लांबल्याने २३ कोटी रुपयांची ही मशीन जवळपास ४८ कोटी रुपयांची झाली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याची गंभीर दखल घेतली. हे मशीन ४ जून २०२५पर्यंत खरेदी करण्याचे आदेश दिले होते. परंतु सरकारने बुधवारी या यंत्रासाठी ३५ कोटी, ८२ लाख ६४ हजार रुपयांना मंजुरी दिली. आता तरी सरकार या यंत्रासाठी तातडीने खरेदी प्रक्रिया करणार का, याकडे सर्व कॅन्सरबाधित रुग्णांचे लक्ष लागले आहे.

'सीएमसी'चा भार मेडिकलवरप्राप्त माहितीनुसार, कॉम्प्रिहेन्सिव्ह मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट (सीएमसी) म्हणजे यंत्राचा देखभाल करारावर होणारा खर्च सरकारने अधिष्ठातास्तरावर करण्याचा सूचना केल्या आहेत. त्यावर जवळपास सहा कोटींवर खर्च येण्याची शक्यता आहे. याशिवाय पाच वर्षांची यंत्राची वॉरंटी न घेता एक वर्षाची वॉरंटी घेण्याचा सूचनाही करण्यात आल्याचे समजते.

टॅग्स :nagpurनागपूरCancer Awarenessकॅन्सर जनजागृतीcancerकर्करोग