शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात मनरेगाच्या ३५ हजार कामांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 21:51 IST

शासनाने ग्रामीण भागात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला आहे. राज्यात या योजनेतुन वैयक्तिक तसेच सामूहिक स्वरूपाच्या एकूण ३५ हजार कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे.

ठळक मुद्देग्रामीण नागरिकांना रोजगाराचा दिलासा : जलसंधारण व सिंचनाच्या कामांना प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना प्रतिबंधासाठी सध्या संपूर्ण राज्यात लॉकडाऊनची उपाययोजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुरासमोर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न बिकट होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर हातावर पोट असणाऱ्या या घटकांना दिलासा देण्यासाठी शासनाने ग्रामीण भागात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला आहे. राज्यात या योजनेतुन वैयक्तिक तसेच सामूहिक स्वरूपाच्या एकूण ३५ हजार कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. यात नागपूर विभागातील ५,२५८ कामांचा समावेश आहे.केंद्र शासनाने सोशल डिस्टन्सिंग विषयक निर्देशाचे पालन करत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामांना मान्यता दिली आहे. त्यामुळे जलसंधारण, सिंचन विहिरी ,पशुंसाठी गोठ्यांचे बांधकाम, व्हर्मी कंपोस्ट, फलोत्पादन आदी वैयक्तिक स्वरूपाच्या कामांसोबतच शेतीला जोडणारे रस्ते जलसंधारण, नाला सरळीकरण, सामूहिक विहिरी, वृक्षारोपणाची पूर्वतयारी तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे घेणे सुलभ झाले असल्याची माहिती मनरेगा आयुक्त ए. एस. आर नायक यांनी दिली.खरीप हंगामाच्या दृष्टीने शेतीसाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या कामाच्या जलसंधारणाची तसेच सिंचन विहिरींची कामे प्राधान्याने सुरू करावी यासाठी जिल्हास्तरावर रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी यांनी गावनिहाय मंजूर झालेल्या कामांचे नियोजन करून त्यानुसार तालुका व ग्रामीण स्तरावर प्रत्यक्ष काम सुरू होईल या दृष्टीने नियोजन करावे यासाठी लाभार्थ्यांशी व्यक्तीश: संपर्क साधावा अशा सूचना मनरेगा आयुक्त नायक यांनी दिल्या आहेत.कृषीसंलग्न वैयक्तिक कामांना प्राधान्यग्रामीण भागात मनरेगा अंतर्गत कामे सुरू करताना कृषीसंलग्न अशा वैयक्तिक कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. यामध्ये ४,२०८ सिंचन विहिरी, ५,३०४ पशुगोठे, ८,३६६शोकपीट तसेच शेततळी, विहीर पुनर्भरण आदी कामांना प्राधान्य देण्यात आले आहे.नागपूर विभागातील मंजूर जिल्हानिहाय कामांची संख्याचंद्रपूर ६३६गडचिरोली १,६३८गोंदिया १,६५८नागपूर ६०५वर्धा ६६५भंडारा २,०५६

टॅग्स :jobनोकरीMaharashtraमहाराष्ट्र