शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसात नागपुरातील  २१५ कोटींच्या सिमेंट रस्त्यांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 21:24 IST

स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी १६० कोटींच्या सिमेंट रस्त्यांना मंजुरी देण्यात आली. महापालिके ची आर्थिक परिस्थिती बिकट असताना या कामासाठी निधी कसा उपलब्ध करणार अशी चर्चा असतानाच बुधवारी समितीच्या बैठकीत पुन्हा ५५ कोटींच्या सिमेंट रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. दोन दिवसात २१५ कोटींच्या सिमेंट रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देस्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी १६० कोटींच्या सिमेंट रस्त्यांना मंजुरी देण्यात आली. महापालिके ची आर्थिक परिस्थिती बिकट असताना या कामासाठी निधी कसा उपलब्ध करणार अशी चर्चा असतानाच बुधवारी समितीच्या बैठकीत पुन्हा ५५ कोटींच्या सिमेंट रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. दोन दिवसात २१५ कोटींच्या सिमेंट रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील सिमेंट रस्त्यांची २९ टक्के कामे पूर्ण झालेली आहे. ६० टक्के कामे अद्याप अपूर्ण वा सुरू झालेली नाही. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने विकास कामांची गती मंदावली आहे. याचा फटका सिमेंट रस्त्यांनाही बसला आहे.तिसऱ्या टप्प्यात ४१.५ कि.मी. लांबीचे १० पॅकेजमधून २३२ कोटींचे ३९ रस्ते केले जाणार आहे. दोन दिवसात सर्व पॅकेजमधील कामांना मंजुरी देण्यात आली.कार्यादेशाला लागणार विलंबतिसऱ्या टप्प्यातील सिमेंट रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. परंतु तिजोरी खाली असल्याने महापालिका आपल्या वाट्याचे ८० कोटी कसे देणार असा प्रश्न कंत्राटदारांना पडला आहे. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे कंत्राटदारांची २५० कोटींची बिले थांबलेली आहे. अशा परिस्थितीत कार्यादेशाला विलंब लागणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.कंत्राटदारांचे कामबंद आंदोलन२५० कोटींची बिले थकल्याने कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडले आहे. थकीत वेतनासाठी महापालिका कंत्राटदार संघटनेने बिले न मिळाल्यास कामबंद ठेवणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानुसार बुधवारी मनपातील सर्व कंत्राटदारांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. यावर तोडगा न काढल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष विजय नायडू यांनी दिला आहे.शहरात स्मार्ट बसस्थानकनागपूर शहरात खासगी सहभागातून १५८ खासगी बस स्थानक निर्माण करण्यात आले आहे. याठिकाणी दहा वर्षापर्यत जाहिरात करण्याचे अधिकार मे. साईन पोस्ट इंडिया प्रा.लिमिटेडला देण्यात आले आहे. २०११ पासून या कंपनीने महापालिकेला २३.१८ लाखांची रॉयल्टी दिली आहे. परंतु स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत बसस्थानकांचा चेहरामोहरा बदलणार आहे. सर्व १५८ बस स्थानके बदलवून या ठिकाणी स्मार्ट बस स्थानके निर्माण केली जाणार आहे तर काढण्यात येणारी स्थानके शहराच्या अंतर्गत भागात लावली जाणार आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाroad safetyरस्ते सुरक्षा