शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्जा विभागातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती रद्द होणार; ऊर्जामंत्र्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 11:42 IST

ऊर्जा विभागातील तिन्ही कंपनीत ज्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्याची समीक्षा करून त्या तातडीने रद्द कराव्या, असे आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देविदर्भ-मराठवाड्यातील कामांचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऊर्जा विभागातील तिन्ही कंपनीत ज्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्याची समीक्षा करून त्या तातडीने रद्द कराव्या, असे आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत त्यांनी उपरोक्त आदेश दिले. मागासवर्गीयांना पदोन्नती देण्याबाबत प्राधान्याने कार्यवाही करावी आणि महावितरणची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन मनुष्यबळाची भरती करावी, असे आदेशही यावेळी दिले.शासनाच्या विविध विभागात अनेक पदे रिक्त आहेत. ही पदे भरून तरुणांना संधी देण्याऐवजी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची सेवा घेतली जात असल्याकडे लोकमतने लक्ष वेधले होते. याची दखल राऊत यांनी घेतली.वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना अत्यंत प्रभावीपणे करा, वीज जाण्याची पूर्वसूचना ग्राहकांना मिळालीच पाहिजे, यासाठी यंत्रणा अधिक कार्यक्षम बनवा तसेच ज्या ठिकाणी अधिकाºयांची-कर्मचाऱ्यांची अकार्यक्षमता दिसून येत असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करा. वीज ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा मिळत नाही, ही गंभीर बाब आहे. ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिक सक्रियपणे कामे करावी, ज्या संस्थांकडे ही कामे दिली आहेत त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करा, कामांची गुणवत्ता तपासा आणि कामे संथपणे होत असेल तर संबंधित संस्थेला काळ्या यादीत टाका असे आदेशही त्यांनी दिले.

 

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊत