नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागप्रमुखपदी प्रमोद मुनघाटे यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 11:22 AM2020-08-19T11:22:01+5:302020-08-19T11:22:30+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विषयाचे विभागप्रमुख म्हणून डॉ. प्रमोद मुनघाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Appointment of Pramod Munghate as Head of Marathi Department of Nagpur University | नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागप्रमुखपदी प्रमोद मुनघाटे यांची नियुक्ती

नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागप्रमुखपदी प्रमोद मुनघाटे यांची नियुक्ती

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विषयाचे विभागप्रमुख म्हणून डॉ. प्रमोद मुनघाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याच विभागात ते प्राध्यापक म्हणून दीर्घकाळ कार्यरत आहेत. डॉ. मुनघाटे हे विद्यापीठातील भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासनाचेही प्रमुख आहेत. त्यांनी यापूर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनाचे प्रमुखपदही अनेक वर्षे सांभाळले आहे. मराठीतील अनेक मासिकांमधून त्यांचे साहित्य व सामाजिक विषयावरील लेख सातत्याने प्रसिद्ध होत असतात. डॉ. मुनघाटे यांनी महाराष्ट्र शासनाच्या अनेक समित्यांवर काम केले आहे. भारतीय साहित्य अकादमीच्या मराठी सल्लागार समितीचेदेखील ते सदस्य आहेत.

 

Web Title: Appointment of Pramod Munghate as Head of Marathi Department of Nagpur University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.