शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बोर्डाच्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द  : नव्या सरकारने केल्या बरखास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 00:06 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावर कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या करण्यात येतात. बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेल्या नियुक्त्या युती शासनाने सप्टेंबर २०१९ मध्ये केल्या. परंतु महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या सर्व नियुक्त्या रद्द करण्यात आल्या.

ठळक मुद्देसप्टेंबर २०१९ मध्ये झाल्या होत्या नियुक्त्या

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावर कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या करण्यात येतात. बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेल्या नियुक्त्या युती शासनाने सप्टेंबर २०१९ मध्ये केल्या. परंतु महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या सर्व नियुक्त्या रद्द करण्यात आल्या.शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने बुधवारी शासन निर्णय काढून या नियुक्त्या रद्द केल्या आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ हे स्वायत्त मंडळ आहे. या मंडळांतर्गत विविध समित्या असतात. समितीवर नियंत्रण ठेवण्याचे काम अशासकीय सदस्य करतात. त्याचबरोबर मंडळाच्या धोरणात्मक निर्णयात या सदस्यांना सहभागी करून घेतले जाते. अशासकीय सदस्यामुळे मंडळाच्या कामकाजावर तसेच परीक्षेसंदर्भातील प्रक्रियेवर अशासकीय सदस्यांचे नियंत्रण असते. राज्य मंडळावर शिक्षण तज्ज्ञ व महाविद्यालयाच्या प्राचार्याची नियुक्ती केली जाते. तर विभागीय मंडळावर मुख्याध्यापक, प्राचार्य कनिष्ठ महाविद्यालय, शिक्षक (माध्यमिक विभाग), शिक्षक (कनिष्ठ महाविद्यालय) व्यवस्थापन समिती (माध्यमिक) व व्यवस्थापन समिती (कनिष्ठ महाविद्यालय) येथून सदस्यांची नियुक्ती केली जाते. अशासकीय सदस्यांचा कार्यकाळ ४ वर्षाचा असतो. २०१२ मध्ये अशासकीय सदस्य म्हणून सदस्यांची नियुक्ती केली होती. भाजपाचे सरकार आल्यानंतर २०१४ मध्ये हे सदस्य बरखास्त करण्यात आले. त्यानंतर सप्टेंबर २०१९ पर्यंत बोर्डावर अशासकीय सदस्यांची नियुक्ती केली नाही. सप्टेंबर २०१९ मध्ये शासनाने अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या केल्या. नव्या सरकारने वर्षही होण्याच्या आत त्या सर्व रद्द केल्या. विशेष म्हणजे हे सर्व सदस्य शिक्षण क्षेत्रातील असतात. बोर्डाच्या कामकाजात आपल्या अनुभवाचे योगदान देतात. पण सरकारला वाटेल तेव्हा नियुक्त्या देणे आणि रद्द करणे या प्रकारामुळे बोर्डाचे पर्यायाने शिक्षणाचे नुकसान होते. ही बाब योग्य नाही.मिलिंद वानखेडे, माजी सदस्य, नागपूर विभागीय शिक्षण मंडळ शासन आपल्या सोयीने मंडळावर नियुक्त्या करते आणि त्या रद्दही करते. आता नियुक्त्या रद्द केल्यामुळे ही रिक्त पदे फार काळ ठेवू नये. नवीन अनुभवी सदस्यांची लवकरात लवकर नियुक्ती करावी.पुरुषोत्तम पंचभाई, अध्यक्ष, गणित अध्यापक मंडळ

टॅग्स :Educationशिक्षण