शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर परिवहन विभागात कंत्राटी नियुक्ती : युवकांना नाकारून सेवानिवृत्तांना संधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 12:20 IST

विविध पदांची भरती करतानाही विशिष्ट वयोमर्यादा निश्चित असते. परंतु नागपूर महापालिकेचा परिवहन विभाग याला अपवाद आहे. या विभागात युवकांना डावलून सेवानिवृत्तांना संधी दिली जाते.

ठळक मुद्देवयोमर्यादा ६५ वरून ७० पर्यंत वाढविली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :  विविध पदांची भरती करतानाही विशिष्ट वयोमर्यादा निश्चित असते. परंतु महापालिकेचा परिवहन विभाग याला अपवाद आहे. या विभागात युवकांना डावलून सेवानिवृत्तांना संधी दिली जाते. याचा प्रत्यय कंत्राट पद्धतीने होणाऱ्या भरतीत वयोमर्यांदा ६५ वरून ७० पर्यंत ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे महापालिका गेल्या दीड वर्षापासून परिवहन सेवा चालवीत आहे. परंतु या विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांची वानवा आहे. या विभागाचा कारभार कंत्राट पद्धतीवर सुरू आहे.परिवहन समितीने एमएमसी कायद्यात दिलेल्या अधिकाराचा दुरुपयोग करून १८ पदे ११ महिन्यांसाठी कंत्राट पद्धतीने भरण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. हा प्रस्ताव परिवहन विभागाने तयार केला आहे. यात वाहतूक व्यवस्थापक, कामगार व जनसंपर्क अधिकारी, लेखा अधिकारी, दोन प्रमुख रस्ते निरीक्षक, दोन पर्यवेक्षक, सहायक लेखापाल, आठ सहायक २२५ांचा समावेश आहे. मात्र वयोमर्यादेवर समितीच्या सदस्यांचा आक्षेप आहे. परिवहन समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. मात्र विभागात सेवानिवृत्त अधिकाºयांची नियुक्ती करण्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांनी स्वत:च्या फायद्यासाठी वयोमर्यांदा ७० पर्यंत वाढविली आहे. वास्तविक परिवहन विभागात युवकांना संधी मिळाली तरच हा विभाग सक्षम होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाहतूक व्यवस्थापकाचे वय ६५ ते ७० हून अधिक नसावे, असा उल्लेख प्रस्तावात करण्यात आला आहे. तसेच जनसंपर्क अधिकारी, लेखा अधिकारी, रस्ते निरीक्षक, पर्यवेक्षक, सहायक लेखापाल पदासाठी वयोमर्यादा ६५ वर्षे ठेवण्यात आली आहे. वास्तविक या पदावर युवकांची नियुक्ती होणे अपेक्षित आहे.

काम करणारे हवेतपरिवहन विभागाकडून कंत्राटी पद्धतीवर नियुक्तीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्याला समितीने मंजुरी दिल्याची माहिती परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी दिली. वयोमर्यांदा ६५ ते ७० ठेवण्यात आली आहे. अनुभवाची गरज आहे. काम करणाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र काम न करणाºयांना बाहेरचा रस्ता दाखविला जाईल. हा अधिकार परिवहन समितीला आहे. परिवहन विभागाचा तोटा कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहे. परंतु काही अधिकारी फाईल मंजुरीत आडकाठी आणत आहेत. त्यांना बाहेरचा रस्ता दाखविला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका