शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

हाऊसकीपिंगच्या नावाखाली रेल्वेला कोट्यवधींचा चुना, गरज नसताना सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 05:01 IST

रेल्वेत प्रत्येक कामाचे कंत्राट देण्याचा सपाटा सुरू आहे. यात नागपूरवरून रात्री सुटणा-या आणि सकाळी पुणे, मुंबईत पोहोचणा-या रेल्वेगाड्यात ‘आॅन बोर्ड हाऊसकीपिंग सर्व्हिसेस’ची (ओबीएचएस) गरज नाही.

- दयानंद पाईकरावनागपूर : रेल्वेत प्रत्येक कामाचे कंत्राट देण्याचा सपाटा सुरू आहे. यात नागपूरवरून रात्री सुटणा-या आणि सकाळी पुणे, मुंबईत पोहोचणा-या रेल्वेगाड्यात ‘आॅन बोर्ड हाऊसकीपिंग सर्व्हिसेस’ची (ओबीएचएस) गरज नाही. परंतु नागपूर विभागात त्यासाठी कोट्यवधी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. हा रेल्वेच्या पैशांचा गैरवापर असून यात अधिकारी आणि कंत्राटदारांचा फायदा होत असल्यामुळे असे कंत्राट देण्यात येत असल्याची चर्चा रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये आहे.नागपूर-पुणे गरीबरथ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेस, नागपूर-छत्रपती शिवाजी टर्मिनस दुरांतो एक्स्प्रेस, अजनी-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, अजनी-पुणे, नागपूर-छत्रपती शिवाजी टर्मिनस सेवाग्राम एक्स्प्रेस या गाड्यात ‘ओबीएचएस’कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात नागपूर रेल्वे स्थानकासाठीचे कंत्राट पीयूष ट्रेडर्सला तर अजनीचे कंत्राट निम्बस कंपनीला देण्यात आले आहे. नागपूरवरून सुटणाºया रेल्वेगाड्यांची योग्य प्रकारे सफाई करूनच त्या प्लॅटफॉर्मवर लावण्यात येतात. पीट लाईनवर या गाड्या चांगल्या प्रकारे धुतल्यानंतर त्या प्रवासासाठी उपलब्ध करून देण्यात येतात. रात्री प्रवासी या गाड्यात बसतात आणि थोड्या वेळात झोपी जातात. त्यामुळे या गाड्यात घाण होण्याची शक्यता उरत नाही. तरीसुद्धा रेल्वेने गाड्यांच्या सफाईसाठी कोट्यवधीचे कंत्राट दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एखादी गाडी २८ ते ३० तास प्रवास करीत असल्यास कचरा होण्याची शक्यता आहे. परंतु १२ ते १४ तासाच्या अंतरात आणि ते सुद्धा रात्रीच्या प्रवासात कचरा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.‘रात्री उशिरा सुटून सकाळी पोहोचणाºया रेल्वेगाड्यात ‘ओबीएचएस’ची गरज नाही. परंतु अशा गाड्यात जर सफाई कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात येत असल्यास ते रेल्वेच्या संपत्तीचे नुकसान आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने असे कंत्राट त्वरित रद्द करण्याची गरज आहे.’-हबीब खान, विभागीय सचिव, नॅशनल रेल्वे मजदूर युनियन, नागपूर विभाग.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे