वर्ग ६ ते ८ वी ला शिकविण्याकरिता विषयनिहाय पदवीधर शिक्षकांची नियुक्ती केली जाते. परंतु फेब्रुवारी २०१८ पासून या नियुक्त्याच करण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे भाषा, विज्ञान व समाजशास्त्र या तिन्ही विषय शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त होत्या. या सर्व जागा भरल्या जाव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने करण्यात आली होती. शिक्षण विभागाकडून नुकतीच याबाबतची प्रक्रिया पार पाडण्यात आली. ज्यामध्ये भाषा -११४ , सामाजिक शास्त्र-१९ तर विज्ञान ८ अशा १४१ सहायक शिक्षकांची विषय पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर व शिक्षणाधिकारी (प्राथ.) चिंतामण वंजारी यांनी बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेला विषय पदवीधर शिक्षक नियुक्तीचा प्रश्न निकाली काढल्यामुळे संघटनेचे अध्यक्ष लीलाधर ठाकरे यांच्यासह सरचिटणीस अनिल नासरे, विलास काळमेघ, राजू बोकडे, सुरेश श्रीखंडे, नीळकंठ लोहकरे, प्रकाश सव्वालाखे, मीनल देवरणकर, पुष्पा पानसरे पदाधिकाऱ्यांनी आभार व्यक्त केले आहे.
दीडशे सहायक शिक्षकांना विषय पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:06 IST