शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

धनवटे कॉलेजच्या प्राचार्यपदी अपात्र उमेदवाराची नियुक्ती :रवींद्र शोभणे यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 23:40 IST

श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचालित स्थानिक धनवटे नॅशनल कॉलेजच्या प्राचार्यपदी नियुक्त झालेले डॉ. सुरेंद्र रामचंद्र जिचकार यांची नियुक्ती अपात्र असल्याचा आरोप डॉ. रवींद्र शोभणे व डॉ. एस.एम. वानखेडे यांनी केला आहे.

ठळक मुद्देसहसंचालकांचा आक्षेप असतानाही विद्यापीठाने दिली मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचालित स्थानिक धनवटे नॅशनल कॉलेजच्या प्राचार्यपदी नियुक्त झालेले डॉ. सुरेंद्र रामचंद्र जिचकार यांची नियुक्ती अपात्र असल्याचा आरोप डॉ. रवींद्र शोभणे व डॉ. एस.एम. वानखेडे यांनी केला आहे. नियमानुसार डॉ. जिचकार यांचा शैक्षणिक अनुभव १५ वर्षांपेक्षा कमी असतानाही कोणत्याही तक्रारींची दखल न घेता त्यांना समोर ठेवूनच प्राचार्य पदाच्या निवडीची प्रक्रिया राबविल्याचा आक्षेप त्यांनी घेतला. उच्च शिक्षण सहसंचालकांनी त्यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला असताना विद्यापीठाने परवानगी कशी दिली, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.मंगळवारी एका पत्रपरिषदेदरम्यान डॉ. शोभणे व डॉ. वानखेडे यांनी याबाबत आरोप केले आहे. त्यांनी सांगितले, या महाविद्यालयातील डॉ.जिचकार यांची नेमणूक जुलै २००० साली झाली होती. यादरम्यान १ सप्टेंबर २००८ ते ८ मे २०१३ या काळात ते अनुक्रमे अभ्यासरजा व त्याला लागूनच विशेष असाधारण रजेवर गेले होते. हा त्यांच्या सुट्यांचा काळ त्यांच्या एकूण शैक्षणिक अनुभवातून वजा करून त्यांची पदनिश्चिती करण्याचे आदेश उच्च शिक्षण सहसंचालकांनी संस्थेला दिले आहेत. त्यांचा सुट्यांचा काळ वजा करता त्यांची सेवा नियमानुसार १५ वर्षांची होत नाही. त्यांनी घेतलेल्या अभ्यासरजेमध्ये कुठलेही संशोधन केले नाही. अभ्यासरजेत केलेल्या अभ्यासाबद्दल कुठलीही माहिती संस्थेकडे उपलब्ध नाही. परंतु अभ्यासरजेचा काळ आपल्या शैक्षणिक अनुभवात ग्राह्य धरीत आपल्या संबंधाच्या बळावर त्यांनी प्राचार्यपद मिळवून घेतल्याचा आरोप डॉ. शोभणे यांनी केला.या महाविद्यालयात प्राचार्यपदाच्या निवड प्रक्रियेत सुरुवातीपासूनच संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. जिचकार यासाठी पात्र नसल्याची जाणीव संस्थेला होती. त्यांच्यासाठी आधी डॉ. चंगोले यांची निवड प्रथम क्रमांकावर केली. डॉ. चंगोले यांचा एपीआय (अकॅडमिक परफॉर्मन्स इंडिकेटर) चारशेच्या आत असूनही आणि तो तपासण्याचा अधिकार संस्था सचिवांना नसतानाही डॉ. चंगोले यांचा एपीआय त्यांनी तपासला. त्यानंतर ‘एपीआय पुरेसा नाही म्हणून प्राचार्यपदाच्या निवडीसाठी माझा विचार करण्यात येऊ नये’, असे शपथपत्रही त्यांच्याकडून लिहून घेण्यात आले. त्यानंतर निवड समितीने दुसऱ्या क्रमांकावर निवड केलेल्या डॉ. जिचकार यांच्या नावाचा प्रस्ताव संस्थेने विद्यापीठाकडे पाठविला.दरम्यान, उच्च शिक्षण सहसंचालकांनी डॉ. जिचकार यांच्या अनुभवाच्या अर्हतेवर आक्षेप घेतला होता व त्यासंदर्भातील पत्र संस्थेलाही पाठविले होते. परंतु त्या पत्राची कुठलीही दखल न घेता संस्थेने डॉ. जिचकार यांचा प्रस्ताव विद्यापीठाक डे पाठविल्याचा आरोप डॉ. शोभणे यांनी केले. यासंदर्भात विद्यापीठालाही तक्रारी केल्या आहेत, चौकशीची मागणीसुद्धा केली आहे. डॉ. जिचकार यांनी निवड समितीलाही खोटी माहिती दिल्याचा आरोप त्यांनी केला.ज्यांचा शैक्षणिक अनुभव १५ वर्षांपेक्षा अधिक होता, ज्यांचा एपीआय हा चारशेपेक्षा कितीतरी अधिक होता, त्याशिवाय संशोधनाचा अनुभव प्रकाशित साहित्याचा अनुभव अधिक होता, अशा नऊ उमेदवारांना डावलण्यात आले व ज्यांची प्राथमिक अर्हता नाही अशा उमेदवाराची नियुक्ती प्राचार्यपदी करण्यात आल्याचे सांगत, यासाठी श्री शिवाजी शिक्षण संस्था आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ या दोन्ही संस्था जबाबदार असल्याचा आरोप डॉ. शोभणे यांनी यावेळी केला.प्राचार्य म्हणून ज्या अटींची व नियमांची पूर्तता करणे गरजेचे असते तीच डॉ. जिचकार पूर्ण करीत नाही. त्यांचा अनुभव १५ वर्षांचा नाही व उच्च शिक्षण सहसंचालकांनी त्यांच्या शैक्षणिक अनुभवावर बोट ठेवले आहे. तथापि, जिचकार यांनी आपल्या शैक्षणिक अनुभवाची सत्य परिस्थिती लपवून प्राचार्यपद पदरात पाडून घेतले. उच्च शिक्षण सहसंचालकांची अनुमती नसताना विद्यापीठाने आंधळेपणाने कागदपत्रांची तपासणी न करता अनुमती दिली. घेतलेल्या आक्षेप व तक्रारींची कुठलीही दखल संस्थेने व विद्यापीठाने घेतली नाही.- डॉ. रवींद्र शोभणेकाही लोकांनी माझ्या नियुक्तीवर विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संचालकांकडे तक्रार केली होती व या दोन्ही संस्थांनी पूर्ण तपास करून माझ्याविरोधातील आक्षेप खारीज केले आहेत. प्राचार्य पदाच्या निवड प्रक्रियेत विविध संस्थांचे जबाबदार सदस्य सहभागी होते व त्यांनी दिलेल्या नियुक्तीनुसार मी १० तारखेला पदावर रुजू झालो आहे. याउपरही कुणाला आक्षेप असेल त्यांनी हायकोर्टात जावे.- डॉ. सुरेंद्र जिचकार

टॅग्स :collegeमहाविद्यालयnagpurनागपूर