शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 20:11 IST

महानगरपालिकेचा कर्मचारी असो की नगर परिषदेचा कर्मचारी असो त्यांची जी कामे आहे तीच कामे ग्रामपंचायत कर्मचारी करतो, असे असताना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी व पेन्शनपासून वंचित ठेवले जाते. गेल्या १५ वर्षांपासून याचा पाठपुरावा करूनही शासन लक्ष देत नाही. ‘आता नाही तर कधीच नाही’ या भूमिकेवर ठाम राहून मोठ्या संख्येत आलेल्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी घोषणांचा पाऊस पाडत मोर्चाचा परिसर दणाणून सोडला.

ठळक मुद्देराज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनची मागणी : मोर्चात हजारो कर्मचाऱ्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महानगरपालिकेचा कर्मचारी असो की नगर परिषदेचा कर्मचारी असो त्यांची जी कामे आहे तीच कामे ग्रामपंचायत कर्मचारी करतो, असे असताना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी व पेन्शनपासून वंचित ठेवले जाते. गेल्या १५ वर्षांपासून याचा पाठपुरावा करूनही शासन लक्ष देत नाही. ‘आता नाही तर कधीच नाही’ या भूमिकेवर ठाम राहून मोठ्या संख्येत आलेल्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी घोषणांचा पाऊस पाडत मोर्चाचा परिसर दणाणून सोडला.‘महाराष्ट्र  राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन’च्यावतीने मंगळवारी विधिमंडळावर राज्यभरातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जोरदार धडक दिली. राज्यभरातून मोठ्या संख्येत कर्मचारी सहभागी झाल्याने मोर्चात जोश दिसून येत होता, तर पोलिसांनी सुरक्षेला घेऊन कडेकोट बंदोबस्त लावला होता. ‘लोकमत’शी बोलताना संघटनेचे सरचिटणीस गिरीश दाभाडकर म्हणाले, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद सेवेत १० टक्के आरक्षण, १०० टक्के वेतन अनुदान आदी मागण्या मंजूर झाल्या. परंतु कर्मचाऱ्यांना पेन्शन व वेतनश्रेणी देण्याची मागणी मंजूर झालेली नाही. विशेष म्हणजे, या दोन मागण्यांसाठी समिती नियुक्त केली. परंतु या समितीची मुदत संपूनही अहवाल सादर झालेला नाही. परिणामी, राज्यातील ६० हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांत प्रचंड असंतोष आहे. कर्मचाऱ्यांना मिळणारे किमान वेतन मानधनही अनेक ठिकाणी मिळत नाही, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.मागण्यांना घेऊन १५ दिवसांत बैठकमागण्यांचे निवेदन वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि ग्रामविकास विभाग मंत्री पंकजा मुंडे यांना दिल्याशिवाय मोर्चा सोडायचा नाही, असा निर्धार संघटनेने केला होता. परंतु दोन्ही मंत्री उपलब्ध होत नसल्याचे पोलिसांकडून सूचना येताच मुख्यमंत्र्यांशी भेट घालून द्या, अशी मोर्चेकरांनी अट टाकली. अखेर मुख्यमंत्र्यांकडून ग्रामविकास राज्यमंत्री दादासाहेब भुसे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी भुसे यांनी शिष्टमंडळाची बैठक घेऊन विविध मागण्यांवर चर्चा केली. यात पेन्शन आणि वेतनश्रेणीच्या मागणीला घेऊन अधिवेशन संपल्यावर १५ दिवसांत वित्त व ग्रामविकास विभाग मंत्री यांच्याशी बैठक लावून निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.खापरी ते नागपूर पायी दिंडीग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी खापरी ते नागपूर पायी दिंडी काढण्यात आली. याचे नेतृत्व संघटनेचे राज्याध्यक्ष विलास कुमरवार व सरचिटणीस गिरीश दाभाडकर यांनी केले. दिंडीला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. मोठ्या संख्येत कर्मचारी यात सहभागी झाले होते. यशवंत स्टेडियम येथे दिंडीचे रूपांतर मोर्चात झाले. विशेष म्हणजे, या दिंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली होती.या मोर्चाचे नेतृत्व विलास कुमरवार, गिरीश दाभाडकर, काझी अल्लाउद्दीन, धनराज आंबटकर, दिलीप जाधव, भाऊसाहेब ढोके, सपना गावंडे, अब्दुल पटवेकर, संपता तांबे, रामेश्वर गायकी, नारायण होंडे, अशोक कुथे, संजय शिंदे आदींनी केले.दीपक म्हैसेकर समितीच्या अहवालानुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन व उपदान द्या, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करा,मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ६१ मध्ये सुधारणा करा, किमान वेतन अनुदानाची परिणामकारक अंमलबजावणी करा, आदी मागण्या या मोर्चाच्या वतीने करण्यात आल्या.

 

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Morchaमोर्चा