शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
2
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
3
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
4
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
5
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
6
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
7
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
8
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
9
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
10
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
11
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
12
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
13
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
14
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
15
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
16
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
17
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
18
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
19
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
20
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल

गोदाम बांधकामासाठी १५ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 

By गणेश हुड | Updated: July 2, 2024 20:42 IST

अर्ज प्राप्त झाल्यास जिल्हास्तरावर लॉटरी पध्दतीने लाभार्थीची निवड करण्यात येईल.

गणेश हूड, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर :  राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (अन्नधान्य) व राष्ट्रीय खाद्य तेल अभियान (गळीतधान्य) सन २०२४-२५  अंतर्गत जिल्हयामध्ये २५०  मे.टन प्रती गोदाम क्षमतेचे पाच गोदाम बांधकामांचे उद्दीष्ट आहे.  या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी उत्पादक संघ, कंपनी  अशा पात्र इच्छुकांनी १५  ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांनी केले आहे.

प्रकल्प किंमतीच्या५० टक्के किंवा १२.५०  लाख रुपयांपैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय आहे. बँकने कर्ज मंजुर केल्यानंतरच अर्जदार या बाबीच्या लाभास पात्र राहील. तसेच महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ यांचे प्राधिकृत अधिकारी अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मान्यता प्राप्त डिझाईन्स, व खर्चाच्या अंदाजपत्रकासह तालुका कृषी अधिकारी कार्यालयास प्रस्ताव सादर करावा. जिल्हयाला मंजूर लक्षांकापेक्षा जास्त लाभार्थीचे अर्ज प्राप्त झाल्यास जिल्हास्तरावर लॉटरी पध्दतीने लाभार्थीची निवड करण्यात येईल.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात यावेत. अधिक माहितीकरिता मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षकांनी केले आहे.

टॅग्स :nagpurनागपूर