शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

बौद्धिक वर्गात झाले फक्त संघकार्याचे आवाहन; गुजरात निकालांच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शनाची अपेक्षा फोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 19:02 IST

गुजरात विधानसभेतील निकालानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून उपदेश देण्यात येईल व अपेक्षापूर्ततेसंदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात संघाने या मुद्यांवर ‘बौद्धिक’ देण्याचे टाळले.

ठळक मुद्देना उपदेश, ना अपेक्षांवर भरसंघ कार्यक्रमांचीच दिली माहितीसंघ संविधानानुसार सरकार्यवाहच सर्वोच्च अधिकारी

योगेश पांडेनागपूर : गुजरात विधानसभेतील निकालानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून महाराष्ट्रातील आमदारांना देण्यात येणाऱ्या उद्बोधन वर्गाला यंदा जास्त महत्त्व आले होते. राज्यातील आमदारांना संघातर्फे उपदेश देण्यात येईल व अपेक्षापूर्ततेसंदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात संघाने या मुद्यांवर ‘बौद्धिक’ देण्याचे टाळले. वर्ग झाल्यानंतर संघाने सखोल मार्गदर्शन केल्याची प्रसार माध्यमांमध्ये चर्चा होती. प्रत्यक्षात केवळ संघकार्याबाबतच येथे माहिती देण्यात आल्याची माहिती संघाच्या विश्वसनीय सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली.सकाळी ८.३० च्या सुमारास आमदार व मंत्री स्मृतिमंदिर परिसरात येण्यास सुरुवात झाली. सर्व मंत्री व आमदारांनी आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर सर्वांचे चहापान झाले. यानंतर महर्षी व्यास सभागृहात वर्गाला सुरुवात झाली. १५ मिनिटे चाललेल्या या वर्गाला नागपूर महानगर सहसंघचालक व डॉ. हेडगेवार स्मारक समितीचे उपाध्यक्ष श्रीधर गाडगे यांनी मार्गदर्शन केले.संघातर्फे आमदारांना अपेक्षा, कार्यप्रणालीतील सुधार, प्रशासनाचे काम इत्यादीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल, अशीच अपेक्षा होती. आमदारदेखील त्याच तयारीने गेले होते. मात्र प्रत्यक्षात संघाने यावर काहीच भाष्य केले नाही. श्रीधर गाडगे यांनी संघाचे कार्य, डॉ. हेडगेवार स्मारक समितीतर्फे चालणारे काम, संघाचे विविध उपक्रम यांची माहिती दिली. सध्या शासनाची धुरा संघ विचारधारेच्या लोकांच्या हाती आहे. संघाच्या कामाचा व्याप वाढला आहे. त्यामुळे संघकार्यात आमदारांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे व सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. स्मृतिमंदिरात चालणारे स्पर्धा परीक्षा केंद्र, वनवासी विद्यार्थी छात्रावास, रुग्णोपयोगी सेवा केंद्र, प्राथमिक चिकित्सा केंद्र याबाबतदेखील त्यांनी माहिती दिली.यावेळी संघाचे प्रांत प्रचारक प्रसाद महानकर, विदर्भ प्रांत कार्यवाह दीपक तामशेट्टीवार, सहकार्यवाह अतुल मोघे, नागपूर महानगर संघचालक राजेश लोया, महानगर प्रचारक क्षितिज गुप्ता, सहकार्यवाह अरविंद कुकडे, रवींद्र बोकारे, मोहन अग्निहोत्री प्रामुख्याने उपस्थित होते.संघ संविधानानुसार सरकार्यवाहच सर्वोच्च अधिकारीयावेळी श्रीधर गाडगे यांनी संघातील निवडणुकांबाबत मंत्री-आमदारांना माहिती दिली. १९४८ साली संघावर बंदी आली. मात्र सरकारने ती बंदी उठविण्याचा निर्णय घेतला. परंतु बंदीचे पाऊल मागे घेत असताना सरकारने अट टाकली. संघाला काँग्रेसमध्ये विलीन करण्याचे प्रयत्न केले. ते यशस्वी न झाल्याने संघाचे संविधान लिहिण्याची अट टाकण्यात आली. त्यानुसार दोन पानांचे संविधान लिहिल्या गेले. त्या संविधानानुसार संघाचे सर्वोच्च अधिकारी हे सरसंघचालक नाहीत, तर सरकार्यवाह हे आहेत. सरसंघचालक हे संघाचे मार्गदर्शक असतात तर सरकार्यवाह हे निवडून आलेले असतात, असे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ