शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सचिन कुर्वे यांच्याविरुद्धची याचिका फेटाळली

By admin | Updated: March 28, 2017 02:03 IST

जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांचा नागपूर हा गृह जिल्हा असल्यामुळे येथे होणाऱ्या स्थानिक निवडणुकांच्या प्रक्रियेपासून त्यांना लांब ठेवण्यात यावे किंवा त्यांची बदली करण्यात यावी, ...

हायकोर्ट : आरोपांत तथ्य नसल्याचे निरीक्षणनागपूर : जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांचा नागपूर हा गृह जिल्हा असल्यामुळे येथे होणाऱ्या स्थानिक निवडणुकांच्या प्रक्रियेपासून त्यांना लांब ठेवण्यात यावे किंवा त्यांची बदली करण्यात यावी, अशा विनंतीसह अ‍ॅड. सतीश उके यांनी दाखल केलेली रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी फेटाळून लावली. याचिकेतील आरोपांत तथ्य नसल्याचे निरीक्षण निर्णयात नोंदविण्यात आले. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व अतुल चांदूरकर यांनी हा निर्णय दिला.निरर्थक याचिका दाखल केल्यामुळे न्यायालय उके यांच्यावर दावा खर्च बसविणार होते. परंतु उके सुनावणीत गैरहजर राहिल्यामुळे व अन्य काही बाबी लक्षात घेता न्यायालयाने दावा खर्च बसविणे टाळले.‘कुर्वे यांनी नागपुरातील विविध शाळांमध्ये व विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेतले आहे. त्यामुळे नागपूर हा त्यांचा गृह जिल्हा ठरतो. ‘यूपीएससी’द्वारे निवड झाल्यानंतर त्यांना उत्तराखंड येथे नियुक्ती देण्यात आली होती. १७ डिसेंबर २०१४ रोजी ते पाच वर्षांच्या प्रतिनियुक्तीवर महाराष्ट्रात आले. २० मे २०१५ रोजी त्यांची नागपूर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वात स्थानिक निवडणुका पारदर्शीपणे होण्याची शक्यता कमी आहे. परिणामी, जिल्ह्यातील स्थानिक निवडणुकांच्या प्रक्रियेपासून त्यांना लांब ठेवण्यात यावे किंवा त्यांची बदली करण्यात यावी’, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. शासनातर्फे वरिष्ठ वकील सुबोध धर्माधिकारी यांनी विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिले तर, राज्य निवडणूक आयोगातर्फे अ‍ॅड. जेमिनी कासट यांनी बाजू मांडली. या प्रकरणात उके आतापर्यंत स्वत:च युक्तिवाद करीत होते. परंतु न्यायालयाच्या अवमानना प्रकरणात दोन महिने कारावासाची शिक्षा झाली असल्यामुळे ते अज्ञात ठिकाणी लपून बसले आहेत. पोलिसांकडून अटक होण्याच्या भीतीमुळे ते या प्रकरणावरील सुनावणीत हजर राहिले नाही.(प्रतिनिधी)