शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

आपली बस सुरू होणार : परिवहन समितीच्या बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 21:15 IST

कोविडच्या प्रादुभार्वामुळे मागील सात महिन्यांपासून बंद असलेली 'आपली बस’ शहर बससेवा सुरू करण्याच्या प्रस्तावाला परिवहन विशेष समितीच्या बैठकीत मगळवारी मंजुरी देण्यात आली.

ठळक मुद्दे५० टक्के प्रवासी उपस्थितीसह काळजी घ्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविडच्या प्रादुभार्वामुळे मागील सात महिन्यांपासून बंद असलेली 'आपली बस’ शहर बससेवा सुरू करण्याच्या प्रस्तावाला परिवहन विशेष समितीच्या बैठकीत मगळवारी मंजुरी देण्यात आली.मनपा मुख्यालयात परिवहन समिती सभापती बाल्या बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक घेण्यात आली. परिवहन व्यवस्थापक शकील नियाजी, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, अरुण पिंपरुडे, विनय भारद्वाज यांच्यासह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे परिवहन समिती सदस्य नितीन साठवणे, रूपा राय, वैशाली रोहनकर, रूपाली ठाकूर, राजेश घोडपागे उपस्थित होते.कोविडच्या वाढत्या संसर्गामुळे बससेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता राज्य शासनातर्फे अनलॉक सुरू करण्यात आले असून त्या अंतर्गत राज्य परिवहन बससेवा सुरू करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर आपली बस सेवा सुरू करण्याची मागणी सदस्यांनी केली.शहरातील सर्वच आस्थापना, व्यवसाय, उद्योग, कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे आपली बस बंद असल्याने कामगारांचे हाल होत आहेत. प्रवासासाठी जादा भाडेही द्यावे लागत असल्याचे निदर्शनास आणले.बससेवा सुरू करणे गरजेचेशहरातील नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता आपली बस ५० टक्के प्रवासी वाहतुकीसह बस सुरू करण्याचे प्रस्तावाला मंजुरी दिल्याची माहिती बाल्या बोरकर यांनी दिली. यासंदर्भात आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याशीसुद्धा चर्चा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.प्रशासन सकारात्मक निर्णय घेईलअनलॉकसंदर्भात शासनाचे दिशानिर्देश व मुंबई, पुणे शहरात शहर बस सेवेच्या धर्तीवर नागपूर शहरातही बससेवा सुरू करण्यासंदर्भात मनपा प्रशासन लवकरच सकारात्मक निर्णय घेईल, अशी माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाPublic Transportसार्वजनिक वाहतूक