शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ‘आपली बस’ धावणार सीएनजीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 22:05 IST

शहरातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेतर्फे संचालित होणारी ‘आपली बस’ आता सीएनजीवर परावर्तित करण्याचा निर्णय परिवहन समितीने घेतला आहे. शनिवारी परिवहन समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

ठळक मुद्देप्रायोगिक तत्त्वावर ५० बस परावर्तित करणार वाढत्या प्रदूषणाला बसणार आळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेतर्फे संचालित होणारी ‘आपली बस’ आता सीएनजीवर परावर्तित करण्याचा निर्णय परिवहन समितीने घेतला आहे. शनिवारी परिवहन समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.येत्या २६ जानेवारीपासून महापालिकेच्या मालकीच्या ५० बसेस सीएनजी गॅसवर धावणार आहेत. यामुळे शहरातील प्रदूषण कमी होईल. यासोबतच मनपाचा आर्थिक भार कमी होणार आहे. सद्यस्थितीत वाढत्या डिझेलचे दर बघता महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. महापालिकेतर्फे शहर बसच्या संचालनासाठी २०१० मध्ये जेएनएनयूआरएमअंतर्गत तीन डिझेल बस आॅपरेटर यांना प्रत्येकी ७९ बसेस दिलेल्या होत्या. यात महापालिकेचा कुठलाही आर्थिक खर्च वाढणार नसल्याची माहिती सभापती बंटी कुकडे यांनी दिली.बैठकीला स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, परिवहन समिती सभापती बंटी कुकडे, उपसभापती प्रवीण भिसीकर, सदस्य नितीन साठवणे, नरेंद्र वालदे, सदस्या अभिरुची राजगिरे, उज्ज्वला शर्मा, विद्या मडावी, वैशाली रोहणकर, अर्चना पाठक, कल्पना कुंभलकर, निगम सचिव हरीश दुबे, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, वरिष्ठ लेखाधिकारी कावळे, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, अरुण पिपरुडे, रामराव मातकर, सुकीर सोनटक्के, विनय भारद्वाज प्रामुख्याने उपस्थित होते.भंगार बसचा लिलाव डिसेंबरपर्यंत बैठकीमध्ये भंगार बसच्या लिलावासंदर्भात चर्चा करण्यात आली. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. डिसेंबर अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे सभापती कुकडे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Public Transportसार्वजनिक वाहतूकNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका