शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

कोरोनानंतर डेंग्यूने वाढवली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:06 IST

सुमेध वाघमारे नागपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरत नाही तोच डेंग्यूने चिंता वाढवली आहे. मे महिन्यात डेंग्यूचे ६ रुग्ण ...

सुमेध वाघमारे

नागपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरत नाही तोच डेंग्यूने चिंता वाढवली आहे. मे महिन्यात डेंग्यूचे ६ रुग्ण असताना जून महिन्यात ८६ तर मागील १४ दिवसात ९६ रुग्णांची नोंद झाली. जानेवारी ते आतापर्यंत डेंग्यूचे १९४ रुग्ण आढळून आले. चार संशयित रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. डेंग्यूवर निश्चित उपचार नाही. यातच तो झपाट्याने वाढत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रोगाला नियंत्रणात ठेवण्यासाठी मनपाचा हिवताप व हत्तीरोग विभागाने कंबर कसली आहे. परंतु यात लोकांचा सहभाग आवश्यक आहे.

एक डास माणसांची किती दाणादाण उडवतो आणि व्यवस्था कोलमडून टाकतो, याचा अनुभव मागील नऊ वर्षांपासून नागपूरकर अनुभवत आहे. शहरात पहिल्यांदाच २०१२ मध्ये डेंग्यूचे २३७ रुग्ण व ५ मृत्यूची नोंद झाल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर २०१३ मध्ये २४० रुग्ण व दोन मृत्यू, २०१४ मध्ये ६०१ रुग्ण, २०१५ मध्ये २३० रुग्ण, २०१६ मध्ये १९५ रुग्ण, २०१७ मध्ये १९९ रुग्ण, २०१८ मध्ये ५६५ रुग्ण, २०१९ मध्ये सर्वाधिक ६२७ रुग्ण , २०२०मध्ये सर्वात कमी १०७ रुग्ण तर १४ जुलै २०२१पर्यंत १९४ रुग्णांची नोंद झाली. पाऊस लांबल्याने व उकाडा वाढल्याने घराघरातील कुलर अद्यापही सुरू आहेत. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढल्याचे बोलले जात आहे.

-डेंग्यूची पैदास पाच एमएल पाण्यातही

‘एडीस इजिप्ती’ प्रजातीच्या डासांच्या मादीद्वारे डेंग्यूचा संसर्ग पसरतो. हे डास चिकनगुनिया, पिवळा ताप आणि झिका विषाणूच्या संक्रमणास देखील कारणीभूत ठरतात. डेंग्यू डासांची पैदास पाच ‘एमएल’ पाण्यातही होत असल्याने आजार बळावतो. यामुळे पाणी साचून राहणार नाही, साचलेले पाणी झाकून ठेवण्याची, पाण्याची टाकी, विहिरीमध्ये गप्पीमासे सोडण्याची, कुलरचे पाणी आठवड्यातून एकदा रिकामे करून टाकीचा तळ स्वच्छ करण्याचे आवाहन केले जात आहे.

-प्रभाग क्र. ५ व ९ मध्ये सर्वाधिक रुग्ण

मनपाच्या सतरंजीपुरा झोनअंतर्गत येणाऱ्या वसाहतीत जुलै महिन्यात सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण आढळून आले. झोनमधील प्रभाग क्र. ५ मध्ये ९ तर प्रभाग क्र. २१मध्ये ९ असे एकूण १८ रुग्णांची नोंद झाली आहे.

- नेहरूनगर झोन वसाहतीत १६ रुग्ण

मनपाच्या सतरंजीपुरा झोननंतर नेहरुनगर झोनमधील वसाहतीत सर्वाधिक, १६ रुग्णांची नोंद झाली आहे. यात प्रभाग क्र. २६ मध्ये १, प्रभाग क्र.२७ मध्ये ३, प्रभाग क्र. २८ मध्ये ९ तर प्रभाग क्र. ३० मध्ये ३ रुग्ण आहेत.

-सर्वात कमी रुग्ण मंगळवार झोन वसाहतीत

मंगळवारी झोनचा परिसर गजबजलेला व दाटीवाटीने वसलेल्या वसाहतीचा असतानाही येथील वसाहतींमध्ये या महिन्यात सर्वात कमी, केवळ ३ रुग्ण आढळून आले. यात प्रभाग क्र. ९ मध्ये १ तर प्रभाग क्र. ११ मध्ये २ रुग्ण आहेत.

महिना : रुग्ण

जानेवारी : ०२

फेब्रुवारी : ०१

मार्च : ०३

एप्रिल : ००

मे : ०६

जून : ८६

जुलै : ९६

(१४पर्यंत)

- जुलै महिन्यात डेंग्यूची प्रभागातील स्थिती

::लक्ष्मीनगर झोन : १०रुग्ण

प्रभाग क्र. १६ मध्ये १, प्रभाग क्र. ३६ मध्ये ३, प्रभाग क्र. ३७ मध्ये ४ तर प्रभाग क्र.३८मध्ये २ रुग्ण

::धरमपेठ झोन :१२ रुग्ण

प्रभाग क्र. १२ मध्ये ४, प्रभाग क्र. १३ मध्ये ३ तर प्रभाग क्र. १४मध्ये ५ रुग्ण

:: हनुमाननगर झोन : १५ रुग्ण

प्रभाग क्र.२९ मध्ये ७, प्रभाग क्र.३२ मध्ये ३ तर, प्रभाग क्र. ३४ मध्ये ५ रुग्ण.

:: धंतोली झोन : ६ रुग्ण

प्रभाग क्र. १७ मध्ये ४ तर प्रभाग क्र.३५मध्ये २ रुग्ण

:: नेहरूनगर झोन : १६

प्रभाग क्र. २६मध्ये १, प्रभाग क्र.२७मध्ये ३, प्रभाग क्र. २८मध्ये ९ तर प्रभाग क्र. ३० मध्ये ३ रुग्ण

:: गांधीबाग झोन : ५ रुग्ण

प्रभाग क्र. १८ मध्ये २, प्रभाग क्र. १९ मध्ये २ तर, प्रभाग क्र. २२ मध्ये १ रुग्ण

:: सतरंजीपुरा झोन : १८रुग्ण

प्रभाग क्र. ५ मध्ये ९ तर प्रभाग क्र. २१मध्ये ९ रुग्ण

:: लकडगंज झोन : ६ रुग्ण

प्रभाग क्र. ४ मध्ये ३ तर प्रभाग क्र. २३मध्ये ३ रुग्ण

::आसिनगर झोन : ५ रुग्ण

प्रभाग क्र. २ मध्ये ३, प्रभाग क्र. ३ मध्ये ०१ तर, प्रभाग क्र. ६मध्ये ०१ रुग्ण

:: मंगळवारी झोन : ३ रुग्ण

प्रभाग क्र. ९मध्ये १ तर प्रभाग क्र. ११ मध्ये २ रुग्ण