शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

शिकाऱ्यांना बंदूक देणाऱ्यास नाकारला अटकपूर्व जामीन

By admin | Updated: March 23, 2015 02:34 IST

जलालखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सालई रिठी गुमगाव जंगलातील मोराच्या शिकार प्रकरणी भरमार बंदूक उपलब्ध करून देणाऱ्या एका आरोपीचा ...

नागपूर : जलालखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सालई रिठी गुमगाव जंगलातील मोराच्या शिकार प्रकरणी भरमार बंदूक उपलब्ध करून देणाऱ्या एका आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज एस. डी. जगमलानी यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. गोविंदसिंग देवीसिंग बावरी , असे आरोपीचे नाव असून तो रामठी येथील रहिवासी आहे. या प्रकरणाची हकीकत अशी की, सहायक पोलीस निरीक्षक पी. एस. जाधव आणि त्यांचे पथक एका खून प्रकरणाच्या तपासासाठी जात असताना त्यांना गुमगाव भागात एका नहरावर हिरोहोंडा मोटरसायकल संशयास्पद स्थितीत गवसली. परिसराची पाहणी करीत असतानाच चार जण पळताना दिसले. पथकाने पाठलाग करून त्यांना पकडले. दशरथ सोनचित्ते, शिवनाथ रामचंद्र सोनचित्ते, किरण नरेंद्र बावणे आणि जगन रामा सहारे, अशी त्यांची नावे होती. ते सर्व वर्धा जिल्ह्याच्या कारंजा घाडगे तालुक्याच्या परसोडी येथील रहिवासी होते. चौकशीत त्यांनी भरमार बंदुकीने मोराची शिकार केल्याचे सांगितले. त्यांनी दगडाखाली दडवून ठेवलेले जखमी मोर दाखवले. आरोपींकडून बंदूक, नायलॉनचे धागे जप्त करून मोरास उपचारार्थ लोहारी सावंगा येथील उपचार केंद्रात नेण्यात आले. १४ रोजी मोराचा मृत्यू झाला. मोराच्या शवविच्छेदनात छर्रे आढळून आले. चारही आरोपींना वन्य जीव संरक्षण अधिनियमाच्या कलम १६ (अ),(ब),(क) आणि ५१ तसेच भारतीय हत्यार कायद्याच्या ३/२५ कलमान्वये अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी बंदूक गोविंदसिंग बावरी याने दिल्याचे आणि मोटरसायकलही त्याच्याच मालकीची असल्याचे सांगितल्याने त्यालाही आरोपी करण्यात आले. गोविंदसिंगने अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असता तो फेटाळण्यात आला. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील लीलाधर शेंदरे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)