शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने सुरू केल्यात अ‍ॅण्टीबॉडी टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 00:15 IST

कोरोनाचे आता काही ठराविक लक्षण राहिले नाही. वैद्यक शास्त्राने कोरोनाची अनेक लक्षणे सांगितलेली आहे. अनेकांना ते लक्षण आढळल्यानंतरही त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ते कोरोनातून बरेही झाले असतील, असाही कयास लावला जात आहे. अशा बऱ्या झालेल्या लोकांचा शोध सरकार घेत आहे. त्यासाठी सरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अ‍ॅण्टीबॉडी टेस्ट घेणे सुरू आहे. विभागीय आयुक्त कार्यालयातील जवळपास ७० ते ८० लोकांच्या शनिवारी अ‍ॅण्टीबॉडी टेस्ट झाल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देविभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा झाल्या तपासण्या

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : कोरोनाचे आता काही ठराविक लक्षण राहिले नाही. वैद्यक शास्त्राने कोरोनाची अनेक लक्षणे सांगितलेली आहे. अनेकांना ते लक्षण आढळल्यानंतरही त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ते कोरोनातून बरेही झाले असतील, असाही कयास लावला जात आहे. अशा बऱ्या झालेल्या लोकांचा शोध सरकार घेत आहे. त्यासाठी सरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अ‍ॅण्टीबॉडी टेस्ट घेणे सुरू आहे. विभागीय आयुक्त कार्यालयातील जवळपास ७० ते ८० लोकांच्या शनिवारी अ‍ॅण्टीबॉडी टेस्ट झाल्याची माहिती आहे.प्लाझ्मा थेरपी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या उपचारासाठी सकारात्मक ठरत आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचारातून बाहेर पडल्यानंतर त्याच्या शरीरातील अ‍ॅण्टीबॉडी प्लाझ्माच्या रुपात घेण्यात येतात. देशभरात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्लाझ्मा आवश्यकता सरकारला भासणार आहे. वैद्यकशास्त्राने कोरोनाची वेगवेगळी लक्षण असल्याचे सांगितले आहे. अनेकजण किरकोळ लक्षण असल्यामुळे दुर्लक्ष केल्याने कोरोनातून बाहेरही पडले आहे. त्यामुळे अशा लोकांचा शोध घेण्यासाठी अ‍ॅण्टीबॉडी टेस्ट केल्या जात आहे. सरकारने त्यासाठी शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपासून सुरुवात केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विभागीय आयुक्त कार्यालयात शनिवारी अ‍ॅण्टीबॉडी टेस्ट करण्यात आल्या आहे. नेमके यामागचे कारण कळू शकले नाही. पण या माध्यमातून सरकार स्वत:चा प्लाझ्मा बँक तयार करण्याचा मानस बाळगत असण्याची शक्यता आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर