शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

लालफितशाहीच्या कात्रीत जादूटोणा विरोधी कायदा

By admin | Updated: November 15, 2014 02:48 IST

विधिमंडळात एखादा कायदा करताना त्याच्याशी संबंधित सर्व बाबींवर अभ्यासपूर्ण चर्चा होत असली तरी नंतर त्याच्या अंमलबजावणीबाबत ...

नागपूर : विधिमंडळात एखादा कायदा करताना त्याच्याशी संबंधित सर्व बाबींवर अभ्यासपूर्ण चर्चा होत असली तरी नंतर त्याच्या अंमलबजावणीबाबत मात्र शासन यंत्रणेकडून दुर्लक्ष होत असल्याने संबंधित कायद्याच्या मूळ उद्देशालाच त्याचा फटका बसतो. जादूटोणा विरोधी कायद्याबाबतही असाच प्रकार झाल्याचे दिसून येते.समाजातील जादूटोण्यासारख्या अनिष्ट व अमानुष पद्धती समूळ नष्ट व्हाव्यात म्हणून आघाडी सरकारने डिसेंबर २०१३ च्या हिवाळी अधिवेशनात जादूटोणा विरोधी विधेयक संमत केले. प्रदीर्घ चर्चेनंतर आणि अनेक दुरुस्त्यांचा समावेश केल्यावर हे विधेयक संमत झाले होते. मात्र या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यानंतर त्याची अंमलबजावणीची प्रक्रिया लालफितशाहीत अडकली. डिसेंबर २०१३ मध्ये विधेयक पारित झाले. त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी ज्या काही उपाययोजना सुचविण्यात आल्या होत्या. त्या प्रत्यक्षात येण्यासही बराच विलंब झालेला आहे. जनजागृती करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समित्यांवर अद्याप अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या करायच्या होत्या. पोलीस ठाण्यात दक्षता अधिकारी नियुक्त करायचे होते. अद्याप अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या झाल्या नाहीत. प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे जे दक्षता अधिकारी नियुक्त करायचे होते ते झाले किंवा नाही याबाबतही संदिग्धता आहे. प्रचार आणि प्रसार तसेच जनजागृतीचे काम तत्काळ करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात कायदा अमलात आल्यावर एक वर्षाने म्हणजे १२ सप्टेबर २०१४ रोजी यासंदर्भात सामाजिक न्याय विभागाने आदेश जारी केले. त्यानुसार १० नोव्हेंबरपासून राज्यातील ३४ जिल्ह्यात व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. नागपूरला हा कार्यक्रम १७ नोव्हेंबरला आहे. नागपूर जिल्ह्यात गत एक वर्षांपासून अद्यापही या कायद्यानुसार एकही तक्रार आली नाही, हे येथे उल्लेखनीय. (प्रतिनिधी)नागपूरमध्ये १७ ला जनजागृती व्याख्यानजादूटोणाविरोधी कायद्याचा प्रचार, प्रसार करण्याच्या शासनाच्या निर्देशानुसार नागपूरमध्ये १७ नोव्हेंबर रोजी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक तसेच राज्य शासनाच्या कार्यक्रम अंमलबजावणी समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव यांचे सांय. ६ वाजता हिंदी मोरभवन येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे, असे जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष पंजाबराव वानखडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. या कार्यक्रमासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन सभागृहाच्या बाहेर स्क्रीन लावण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमासाठी शहरात आणि ग्रामीण भागातही होर्डिंग्ज लावण्यात आले आहे. पुढच्या टप्प्यात ग्रामीण भागातही जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात येणार असून या कायद्याच्या प्रसार आणि प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर करण्याचा विचार आहे,असे वानखडे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, समितीच्या सदस्य छाया सावरकर उपस्थित होते.