शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धर्मांतरणविरोधी कायदा हवा; संघस्थानावरून कॉंग्रेसच्या माजी मंत्र्यांची मागणी

By योगेश पांडे | Updated: June 5, 2025 22:11 IST

राजकीय भाषण न करता आदिवासींच्या समस्या मांडल्या : आदिवासींसाठी धर्मकोड हवा

योगेश पांडे नागपूर : इंदिरा गांधी व पी.व्ही.नरसिंहराव यांच्या कार्यकाळात केंद्रीय राज्यमंत्री राहिलेले माजी कॉंग्रेस नेते अरविंद नेताम हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंचावरून काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. नेताम यांनी यावेळी राजकीय भाषण टाळले. मात्र त्यांनी आदिवासी समाजासमोरील समस्या संघस्थानावरून संघ धुरिणांसमोर मांडल्या. धर्मांतरण ही आदिवासी समाजासमोरील सर्वात मोठी समस्या आहे. आदिवासींना धर्मांतरणाचा सर्वात मोठा धोका आहे व कोणत्याही राज्य शासनाने याला गंभीरतेने घेतले नाही. मात्र आता धर्मांतरणविरोधी कायदा झाला पाहिजे. संघाने या मोहिमेला गती द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यानंतर संघस्थानी येणारे ते कॉंग्रेसशी संबंधित दुसरे मोठे नेते ठरले. नेताम यांनी त्यांच्या भाषणात आदिवासी समाजाचेच मुद्दे मांडले. देशात आदिवासी समाजासमोर अनेक आव्हाने आहेत. अनेकदा सरकार-प्रशासनासमोर गेल्यावर सुनावणीच होत नाही. त्यामुळेच मी संघाकडेच आशेने पाहतो आहे. धर्मांतरणासोबतच आदिवासींचे विस्थापन हीदेखील मोठी समस्या आहे. विकासाच्या नावावर केंद्र शासनाकडून उद्योगपतींना मदत होत आहे. संघाने सर्वांना समान भागीदारी मिळेल यासाठी पुढाकार घ्यावा. आदिवासींच्या जमिनी नेहमीसाठी अधिग्रहित न करता लीजवर घ्याव्या. काम झाल्यावर संबंधित जागा आदिवासींना परत कराव्या. छत्तीसगडमध्ये मागील अनेक वर्षात पैसा कायद्याचे पालन झाले नाही. संघाने हा विषय गंभीरतेने घ्यावा, असे नेताम म्हणाले. डिलिस्टिंग धर्मातरण रोखण्यासाठी मोठे अस्त्र ठरू शकते. त्याच्या समर्थनार्थ वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न हवा, असेदेखील त्यांनी प्रतिपादन केले.

नक्षलवाद डोके काढणार नाही असे धोरण हवेछत्तीसगडमध्ये नक्षलवादाला ठेचण्याचे काम सुरू आहे. मात्र नक्षलवादाची विचारधारा अनेकांमध्ये कायम आहे. भविष्यात नक्षलवादी परत डोके वर काढण्याचा धोका आहे. त्यामुळे त्यादृष्टीने धोरण तयार झाले पाहिजे, अशी मागणी नेताम यांनी यावेळी केली.

आदिवासींसाठी हवा धर्म कोडआम्हालादेखील धर्म कोड मिळावा अशी आदिवासींची मागणी समोर येत आहे. आम्हाला नविन सामाजिक विचारधारा तयार करायची नाही. मात्र आदिवासींनादेखील मान्यता मिळायला हवी. देशात आदिवासी समाजाची ओळख हळूहळू संपत आहे. धर्म कोड असला तर पुढील पिढ्यांना भूतकाळ व ओळख कळेल, असे नेताम म्हणाले.

संघावर स्तुतिसुमनेयावेळी नेताम यांनी संघावर स्तुतिसुमने उधळली. संघभूमीत येऊन बरेच काही शिकण्याची संधी मिळाली. संघाच्या शताब्दी वर्षात येथे येणे हा माझ्यासाठी गौरवाचा क्षण आहे. देशाची अखंडता व सामाजिक समरसतेसाठी देशात संघ वगळता कुठल्याही संघटनेने काम केलेले नाही. आदिवासींच्या विकासासाठी संघच पुढाकार घेऊ शकतो, असे ते म्हणाले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघcongressकाँग्रेस