शहरं
Join us  
Trending Stories
1
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
3
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
4
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
5
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
6
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
7
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", फातिमा सना शेखसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
9
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
10
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
11
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
12
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
13
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
14
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
15
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
16
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
17
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
18
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
19
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
20
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात

स्टारसाठी नेमणार दुसरा आॅपरेटर

By admin | Updated: February 7, 2015 01:58 IST

शहरातील प्रवाशांना चागंली सेवा देण्यात अपयश ठरलेल्या वंश निमय इन्फाप्रोजेक्ट लिमिटेड (व्हीएनआयएल) च्या कामकाजावर नाराजी व्यक्त करून स्टार बससाठी नवीन आॅपरेटर ...

नागपूर : शहरातील प्रवाशांना चागंली सेवा देण्यात अपयश ठरलेल्या वंश निमय इन्फाप्रोजेक्ट लिमिटेड (व्हीएनआयएल) च्या कामकाजावर नाराजी व्यक्त करून स्टार बससाठी नवीन आॅपरेटर नियुक्त करण्याचे निर्देश केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी दिले.गडकरी यांनी शहरातील विकास प्रकल्पांचा रविभवन येथे आढावा घेतला. महापौर प्रवीण दटके यांच्यासह आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, सुधाकर कोहळे, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, सभापती रमेश सिंगारे, गिरीश देशमुख, गोपाल बोहरे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह झोनचे सहायक आयुक्त उपस्थित होते.महापालिका व व्हीएनआयएल यांच्यातील आर्थिक वाद निकाली काढण्यासाठी आर्बिट्रेटर नियुक्त करावा. नवीन करारात कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहू नये यासाठी कायदे तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा, सोबतच करारात डिझेल सोबतच बायोडिझेल, इथेनॉल व वीज याचा समावेश करावा. नवीन आॅपरेटरची नियुक्ती होईपर्यत याच कंपनीकडे स्टार बसची जबाबदारी कायम ठेवावी असे निर्देश गडकरी यांनी दिले.स्टार बस, पेंच टप्प -४, २४ बाय ७, नागनदी शुद्धीकरण, सिवरेज प्रकल्प, बाजार, क्रीडा संकुल तसेच खासगी सहभागातील सुरू असलेल्या व प्रस्तावित प्रकल्पाबाबत अधिकारी व कंत्राटदार यांच्याशी चर्चा करण्यात आली. पेंच टप्पा ४ हा १५ मार्चपर्यत पूर्ण होईल.२५४ कोटीवर चर्चाजेएनएनयूआरएम योजनेंतर्गत हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांसाठी सरकारकडून येणे असलेल्या २५४ कोटींवर चर्चा करण्यात आली. यातील ७० कोटी मिळण्याची आशा आहे. या संदर्भात केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांना लवकरच शिष्टमंडळ भेटणार असल्याची माहिती दटके यांनी दिली.